ठाकरेंच्या सैनिकांचा रिसॉर्टवरील कर्मचार्‍यांशी वाद, तिथेच हर्ट अटॅक, मुख्यमंत्र्यांचे आदेश, रिसॉर्टवर हातोडा!

ठाणे : शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र आणि ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य व ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचे रविवारी सायंकाळी विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरे यांचा मृत्यू रिसॉर्टवरील कर्मचार्‍यांशी झालेल्या वादानंतर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर प्रशासनाने रिसॉर्टवर हातोडा चालवण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले. काल आपल्या कुटूंबासह अर्नाळा बिच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटूंबियाकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले.
Milind More : धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

त्यानुसार या भागातील रिसॉर्टसवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्टसचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉरर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकानी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

पदाधिकारी ठाकरे गटाचा, सीएम आले अंत्यदर्शनाला

मिलिंद मोरे यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ठाण्यात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मोरे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांत्वन केले. यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक देखील उपस्थित होते.

Source link

CM Eknath ShindeMilind More deathMilind More heart attackseven c beach resort virarShiv sena Milind Moreमिलिंद मोरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेना मिलिंद मोरे मृत्यू
Comments (0)
Add Comment