गळतीच्या लाटेत दादांची कमाई, काँग्रेस नेत्याने ‘घड्याळ’ बांधलं, अजित पवारांना दिलासा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचं चित्र असतानाच दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदाराने हातावर ‘घड्याळ’ बांधलं आहे. नितीन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

मुंबईतील अजित पवार यांचे निवासस्थान देवगिरी येथे कन्नडचे माजी आमदार आणि कन्नड साखर कारखान्याचे माजी चेअरमन नितीन पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत नितीन पाटील यांनी पक्षात प्रवेश केला.

लोकशाहीवादी पक्षात मनापासून स्वागत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र, ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे, अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

गळतीचे संकेत

एकीकडे, विधान परिषदेवरील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवार यांची साथ सोडून काही तास होत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी काही धक्के बसण्याचे संकेत मिळत होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

नरहरी झिरवाळ, चेतन तुपे, राजू नवघरे या तिघांचा दादा गटाला हादरे देत शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याचा शक्यता बळावल्या आहेत. त्यामुळे आणखी तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Chetan Vitthal Tupe: भैया, ‘घड्याळ’ काढलं का? अजित दादांच्या आमदाराने चिन्ह हटवलं, तीन आमदार शरद पवार गटात?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र इतक्या महत्त्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ अनुपस्थित होते. त्यामुळे झिरवळांचं तळ्यात मळ्यात असल्याचं दिसत होतं.
Samit Deshmukh : अनिलबाबू, फोटोला फोटोने उत्तर आम्हीही देऊ, समित देशमुखचे शरद पवार-आदित्य ठाकरेंसह फोटो, चित्रा वाघ आक्रमक
दुसरीकडे, आमदार चेतन तुपे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आल्याने ते शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त जाणार का, या चर्चांनी फेर धरला होता, मात्र या दोघांत कसलाही संवाद न झाल्यामुळे चर्चा थांबल्या.

तर हिंगोलीतील वसमतचे आमदार राजू नवघरे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं ‘घड्याळ’ हटवल्याने सर्वांचे डोळे मोठे झाले आहेत.

Source link

ajit pawarchhatrapati sambhajinagar newsMaharashtra politicsनाना पटोलेनितीन पाटीलविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment