आजचे राशिभविष्य, 30 जुलै 2024: हनुमानाची कुंभसह ४ राशींवर कृपा! आर्थिक लाभाची शक्यता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 30 july 2024 Today Horoscope in Marathi : ३० जुलै मंगळवार कृतिका नक्षत्र असून वृद्धि योग आहे. विष्टि आणि भाव करणाचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. कुंभसह ४ राशींना नात्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आर्थिक चणचण कमी होऊ शकते. मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, 30 जुलै 2024: हनुमानाची कुंभसह ४ राशींवर कृपा! आर्थिक लाभाची शक्यता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य
Aaj che Rashi Bhavishya 30 july 2024 :
आज ३० जुलै मंगळवार कृतिका नक्षत्र असून वृद्धि योग आहे. विष्टि आणि भाव करणाचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. कुंभसह ४ राशींना नात्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आर्थिक चणचण कमी होऊ शकते. मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. विशेष मुद्द्यांवर कुणाचा तरी सल्ला घ्यावा. सासरच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत वेळ घालवाल. कौटुंबिक संबंध चांगल्या पद्धतीने सांभाळाल. आळस सोडून रखडलेली कामे पूर्ण करावी. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – नात्यात सावध राहा

आज तुम्हाला व्यावसायिक निर्णय घेताना विचार स्पष्ट ठेवावे लागतील. ज्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नात्यात सावध राहा. फालतू खर्च करणे टाळा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

वृषभ – आर्थिक लाभ होतील

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. व्यवसायात नवीन काही करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. मातृपक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. कोर्टात सुरु असलेल्या वादातून दिलासा मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. विशेष मुद्द्यांवर कुणाचा तरी सल्ला घ्यावा.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग आणि प्राणायामचा अभ्यास करा

मिथुन – मतभेदांना सामोरे जाल

आज व्यवसायात अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. वैयक्तिक नातेसंबंधात मतभेदांना सामोरे जावे लागेल. जीवनातील कठीण अनुभवांमधून धडा घ्याल. कठोर परिश्रम केल्याने यश मिळेल. सासरच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

कर्क – विचारपूर्वक निर्णय घ्या

आज तुम्हाला यश मिळेल. शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा. राजकारणात काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. सासरच्यांकडून आदर मिळेल. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कुणाची तरी मदत लागेल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

सिंह – आळस सोडा

आज तुमचे नाते प्रेमाने जपाल. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा होईल. मोकळेपणाने खरेदी केल्याने मनात शांतीची भावना राहिल. कौटुंबिक संबंध चांगल्या पद्धतीने सांभाळाल. आळस सोडून रखडलेली कामे पूर्ण करावी. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा

कन्या – व्यवसायात बदल

आजचा दिवस तुमचा व्यवसायात झपाट्याने बदल घडवेल. कामात नव्याने नियोजन कराल. निर्णय घेताना मनाचे ऐका. इतरांच्या चुका सहजपणे माफ कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजूंना अन्नदान करा

तुळ – आरोग्याची काळजी घ्या

तुळ राशीसाठी आजचा दिवस व्यवस्था आणि प्रकल्प पूर्ण करण्यात जाईल. ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल. नवीन संधीच सोन कराल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने कामे सोपी होतील. आरोग्याची काळजी घ्या
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळी चंदनाचा टिळा लावा.

वृश्चिक – आर्थिक स्थिती खराब

आज तुम्हाला अहंकार सोडावा लागेल अन्यथा, आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये अधिक उत्साही राहाल. लव्ह लाईफ आनंदी राहिल. ज्यामुळे तुमचा मूड चांगला असेल. मुलांचे आरोग्य बिघडू शकते. बाहेरचे खाणे टाळा
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा

धनु – वाद टाळा

आज नकारात्मक विचारांना दूर करावे लागेल. यशाची पायरी चढण्यासाठी जुन्या मित्राची मदत होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कोणाशीही वाद घालणे टाळावे.
आमज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा ​

मकर – कामात फायदा

आजचा दिवस संभ्रमातला असेल. कामाच्या ठिकाणी जुन्या पद्धती वापरल्याने फायदा होईल. कोणाशीही बोलताना विचारपूर्वक बोल. नातेसंबंधात भावनांवर वर्चस्व राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

कुंभ – आर्थिक स्थिती मजबूत

आज भूतकाळ आणि भविष्यातील योजनांमध्ये अडकू नका. मिळालेली सुवर्णसंधी गमावू नका. नोकरीत बढतीची शक्यता आहे. शत्रू अडथळे निर्माण करतील. कामच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. भविष्यात आर्थिक स्थिती मजबूत राहिल. व्यवसायात तुम्हाला साथ मिळेल. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू खरेदी कराल
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. रात्री कुत्र्याला चपाती खाऊ घाला

मीन – बोलण्यावर नियंत्रण ठेवा

आज कामाच्या ठिकाणी संवादातून समस्येवर मात कराल. कुटुंबात सुरु असलेले वाद आज संपतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. बिझनेसनिमित्त ट्रिपला जाल. ज्यामुळे फायदा होईल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

30 जुलै राशिभविष्य30 राशीचे राशीभविष्यAajche Rashi Bhavishya 30 julydaily rashi bhavishya 30 julyHoroscope Today 30 july In marathitoday rashi bhavishya 30 julyआजची लकी राशीआजचे राशी भविष्य 30 जुलैदैनिक राशी भविष्यमंगळवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment