कोरोनाबाधित लहान मुलाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी..!

एरंडोल:येथे १६ऑक्टोंबर रोजी आढळुन आलेल्या एकाच कुटुंबातील तीन कोरोनाबाधितांपैकी शाळेत शिकणार्या १३वर्षीय लहान मुलाच्या इयत्ता ८वी (फ) या वर्गातील उपस्थित असलेल्या २९ विद्यार्थ्यांची सोमवारी १८ ऑक्टोंबर रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,चेतन गुरव,दिपक गायकवाड यांनी कोरोना चाचणी घेतली.
दरम्यान, सदरील कुटुंब राहत असलेल्या प्रणव नगरात ‘प्रतीबंधक क्षेञ, निर्माण करण्यात आले तसेच या परीसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
नगरपालिकेतर्फे या ठिकाणी सुचना फलक ही लावण्यात आले. शहरात कोरोना चाचणी घेण्यासाठी युध्दपातळीवरून मोहीम राबविण्यात यावी अशी सुचना पुढे येत आहे. कोरोनाबाधित आढळुन आलेल्या महीलेसह तीच्या २ मुलांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत..?याचा ही शोध आरोग्य यंत्रणेने घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Comments (0)
Add Comment