सहा पथकं, सीसीटीव्ही फुटेज अन् एक टीप, असा पकडला गेला तरुणीला निर्घृणपणे संपवणारा दाऊद शेख

नवी मुंबई: उरण येथील तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं असून पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे. आरोपी दाऊद शेख पोलिसांना गेल्या तीन दिवसांपासून गुंगारा देत होता. मात्र, एक टीप आणि कर्नाटकातील गुलबर्गा येथील शहापूरमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तो कर्नाटकमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. आता त्याला महाराष्ट्रात आणल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, ज्यातून त्याने पीडित तरुणीची हत्या का केली, हे समोर येईल.

दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात

२५ जुलैला ही तरुणी घरातून निघाली ती अखेरची, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी दाऊद शेखवर आरोप केले होते. तर तो या घटनेपासून फरार होता. तो कुठे आहे याचा काहीही पत्ता लागत नव्हता. पण, अखेर नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतलं. कर्नाटकच्या गुलबर्गा येथील शहापूरमधून सकाळी सहा वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं.
Uran Murder Case : उरण हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक, कर्नाटकातून दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

दाऊद शेखला कसं ट्रॅक केलं?

या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दाऊद शेख हा पीडित तरुणीचा पाठलाह करत असल्याचं दिसून आलं. ही तरुणी दुपारी ज्या रस्त्यावरुन गेली तिथूनच काही वेळात दाऊद शेख गेल्याचं दिसून आलं. उरणच्या खाडीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दाऊदचा शोध सुरु केला.

दाऊदचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची एकूण सहा पथकं तैनात करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात त्याचा शोध घेतला जात होता. त्यानंतर दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीने तो कर्नाटकात असल्याचं सांगितलं. कर्नाटकमधून तो केरळला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना त्याला त्याआधीच पकडायचे होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचं पथक कर्नाटककडे रवाना झालं. त्यानंतर सकाळी सहा वाजता त्याला गुलबर्गा येथून अटक करण्यात आली.

आता त्याला राज्यात आणण्यात येणार आहे. त्याला संध्याकळपर्यंत नवी मुंबईत आणलं जाईल. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. त्यातून त्याने तरुणीची हत्या कशी आणि का केली याचा उलगडा होईल.

Source link

Dawood Shaikh arrested Karnatakanavi mumbai crimeuran murderyashashree shinde murder caseउरण तरुणी हत्याकांडदाऊद शेखनवी मुंबई गुन्हे शाखानवी मुंबई पोलीसनवी मुंबई हत्या प्रकरणयशश्री शिंदे
Comments (0)
Add Comment