प्रेयसीच्या मैत्रिणीला पीजीमध्ये मध्यरात्री घुसून संपवलं; तपासातून धक्कादायक कारण उघड

बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री एका तरुणीची हत्या करण्यात आली. २३ जुलैला रात्री साडे अकरा वाजता कोरमंगलामधील भार्गवी गर्ल्स पीजीमध्ये घुसून एका तरुणानं धारदार चाकूनं तरुणीची हत्या केली. तिचा गळा कापला आणि आरोपी तरुण घटनास्थळावरुन फरार झाला. तरुणानं दबक्या पावलांनी तिसरा मजला गाठत एका खोलीत घुसून तरुणीवर सपासप वार केले. जीव वाचवण्यासाठी तरुणी बाहेर पळाली. तिच्या पाठोपाठ तरुणही बाहेर आला. त्यानं तिच्यावर वार करत तिचा गळा कापला.

तरुणीचा आक्रोश ऐकून पीजीमध्ये राहणाऱ्या बाकीच्या मुली बाहेर आल्या. पण कोणीही पीडितेच्या मदतीला धावलं नाही. तरुणीला चाकूनं भोसकून आरोपी फरार झाला. मृत तरुणीचं नाव कृती कुमारी होतं. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला. यातून आरोपीची ओळख पटली. त्याचं नाव अभिषेक घोसी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कृती बिहारची, तर अभिषेक मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
Crime News: मुलींच्या PGमध्ये ११.३० वाजता शिरला; गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीचा गळा चिरला; तरुणाला अटक
पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशच्या रायसेनमधून अभिषेकला अटक केली. त्याच्या चौकशीतून कृतीच्या हत्येमागील कारणाचा उलगडा झाला. कृती कुमारी ही अभिषेकच्या माजी प्रेयसीची मैत्रीण होती. अभिषेकचे लहानपणापासूनच एका मुलीवर प्रेम होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिषेकची मैत्रीण बंगळुरुला नोकरीसाठी राहू लागली. तिच्या पाठोपाठ अभिषेकही बंगळुरुला आला आणि भाड्यानं फ्लॅट घेऊन राहू लागला.
Delhi Coaching Centre Flooding: कोचिंग क्लासच्या तळघरात कसं शिरलं पाणी? ‘त्या’ SUVमुळे ३ विद्यार्थी बुडाले? VIDEO समोर
कंपनीत काम करताना अभिषेकच्या प्रेयसीची ओळख कृतीशी झाली. दोघींमध्ये काही दिवसांमध्येच घट्ट मैत्री झाली. अभिषेककडे नोकरी नव्हती. त्यामुळे त्याचे प्रेयसीसोबत अनेकदा वाद व्हायचे. अभिषेकनं अनेकदा चारचौघांमध्ये प्रेयसीचा पाणउतारा केला. त्यामुळे कृतीनं तिच्या मैत्रिणीच्या मदतीनं कृतीला आपल्या खोलीत शिफ्ट केलं. ही बाब अभिषेकला खटकली. तो कृतीचा द्वेष करु लागला.
Delhi Coaching Center Flooding: १९५३मध्ये स्थापना, देशात अनेक शाखा; ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या कोचिंग सेंटरची फी किती?
कृती आणि प्रेयसी राहत असलेल्या पीजीमध्ये अभिषेक मंगळवारी रात्री पोहोचला. त्यानं दबक्या पावलांनी तिसरा मजला गाठला. तिथे त्यानं कृतीची निर्घृण हत्या केली. यानंतर तो रायसेनला पोहोचला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे अभिषेक कृतीवर वार करत असताना कोणीही तिच्या मदतीसाठी पुढं आलं नाही. कृती मदतीसाठी गयावया करताना पीजीमधील अन्य तरुणींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

Source link

bengaluru newscrime newswoman killed in pgwomen stabbedक्राईम न्यूजतरुणीची हत्यापीजीमध्ये तरुणीची हत्याबंगळुरु हत्या
Comments (0)
Add Comment