उरण हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं, दाऊदला कसं पकडलं? अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी सारं सांगितलं

नवी मुंबई: उरण येथील २० वर्षीय तरुणीच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्नाटक येथून ताब्यात घेतलं आहे. तिथे त्याने प्राथमिक तपासात गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे. तसेच, त्याला नवी मुंबईत आणल्यानंतर सखोल चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

कर्नाटकातून दोऊद शेख ताब्यात

२७ तारखेला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होतचा. आज घटनेचा पाचवा दिवस आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी डीसीपी क्राइम आणि डीसीपी झोन २ सीपींच्या मार्गदर्शनाखाली ८-९ पथकं काम करत होते. आम्हाला नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिकांच्या चौकशीत आणि तांत्रिक तपासणीतून जे समोर आलं त्यानुसार दोन तीन जणांवर संशय होता. त्यानुसार पोलिसांचं पथक नवी मुंबई आणि कर्नाटकात पाठवलं होतं. दोन पथकं कर्नाटकात थांबलेलं होतं. आम्ही त्यांना इथून इनपूट देत होतो. त्याआधारे आज सकाळी दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं, असं दीपक साकोरे यांनी सांगितलं.
Uran Murder Case: सहा पथकं, सीसीटीव्ही फुटेज अन् एक टीप, असा पकडला गेला तरुणीला निर्घृणपणे संपवणारा दाऊद शेख

तो कर्नाटकचा असल्याची माहिती होती – दीपक साकोरे

घटना घडल्यानंतर त्याचं लोकेशन सापडत नव्हतं, तो कर्नाटकचा आहे इतकीच माहिती आमच्याकडे होती. त्याच्या मित्राने माहिती दिली आणि त्याआधारे कर्नाटकातील शहापुरातील अलधल या गावातून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात मोहसिनला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तो मृत तरुणीत्या संपर्कात असल्याने संशयाच्या फेऱ्यात होता. पण, मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही संशयित सध्या नाही, असंही अतिरिक्त पोलिस आय़ुक्तांनी सांगितलं.

तरुणी आणि आरोपीमध्ये मैत्री, त्यातूनच हा गुन्हा घडला

मृत तरुणी आणि आरोपीमध्ये मैत्री होती, अशी माहिती आहे. ते गेल्या तीन-चार वर्षांपासून ते संपर्कातक नव्हते, त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. अजून पूर्ण चौकशी व्हायची आहे, त्यानंतरच खरं कारण सांगता येईल.

ते दोघं एकमेकांना ओळखत होते, त्यांनी भेटायचं ठरवलं होतं. हे अपहरणाचं प्रकरण नाही. ते भेटले, त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली अशी शक्यता आहे. ते गेल्या कताही महिन्यांपासून पुन्हा संपर्कात असल्याची माहिती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Source link

Dawood Shaikh arrested Karnatakapost mortem report of yashashree shindeuran murderyashashree shinde murder caseउरण तरुणी हत्याकांडदाऊद शेखनवी मुंबई गुन्हे शाखानवी मुंबई पोलीसनवी मुंबई हत्या प्रकरणयशश्री शिंदे
Comments (0)
Add Comment