Jalna News: दारुच्या बाटल्या आणि ग्लास; झुडुपात तरुणाचा मृतदेह, जालन्यात पुन्हा मर्डर, नागरिक दहशतीत

जालना: जालना शहरात वारंवार हत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिक दहशतीखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जालना शहरातील खरपुडी रोड येथील चालगे मेगा सिटीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. मंगळवार (३० जुलै २०२४) सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि कारवाईला सुरुवात केली.

जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानचा परिसर गेल्या काही दिवसांपासून अतिसंवेदनशील बनला आहे. या परिसरात ज्याप्रकारे खुनाच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पुन्हा एकदा खरपुडी रोडवरील मेगा सिटीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.
Delhi Coaching Centre: लेकीचा मृतदेह थोडा वेळ घरीच राहू द्या! मन भरुन बघायचंय! श्रेयाच्या बाबांचे सुन्न करणारे शब्द
हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव भीम राठोड (३० वय वर्ष) असल्याची माहिती आहे. स्थानिकांनी मृतदेह पाहताच पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा परराज्यातील असल्याची माहिती आहे. या तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि ग्लासही सापडले. त्यामुळे त्याच्यासोबत इथे कोणीतरी असून त्यांनी दारु पार्टी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. तसेच, यातूनच पुढे वाद होऊन या व्यक्तीची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंंद करुन तपास सुरु केला आहे. याप्रकरणी या व्यक्तीसोबत आणखी कोण होतं याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, फिंगर प्रिंट टॅगर दिगंबर कठाळे, गणेश वाघ, फॉरेन्सिक टॅगर रवी खलसे जमादार मानसिंग बावरे यांच्यासह शासकीय पंचनामा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पंचनामा केला.

Source link

crime news todayjalna crime newsjalna murderक्राइमक्राइम न्यूजजालना न्यूजजालना बातम्याहत्या
Comments (0)
Add Comment