तू निघालास न् १५ मिनिटात बातमी, हर्षलच्या निधनाने मित्र हळहळले, उमद्या पत्रकाराचा अकाली अंत

धुळे : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत मागच्या चाकाखाली चिरडला गेल्यामुळे उमद्या पत्रकाराचा मृत्यू झाला. मूळ धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी असलेला आणि सध्या मुंबईत निवासी असलेल्या हर्षल भदाणे पाटील याला अपघातात प्राण गमवावे लागले. हर्षलच्या मृत्यूने भदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत पत्रकारिता क्षेत्रात काम केलेले सहकारी, मित्र परिवार, चाहता वर्ग आणि राजकीय नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा लाडका ‘भाऊ’ हरपल्याने सर्वच शोकसागरात बुडाले आहेत. अनेक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

कसा झाला अपघात?

हर्षल भदाणे पाटील हा धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथे आपल्या गावी गेला होता. यावेळी तो धुळे शहरात कामानिमित्त गेला होता. सोमवारी सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्याची गाडी उभी होती. त्याच वेळी समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला उडवले. यावेळी हर्षलने स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

इतकंच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्याचे काम सुरु असताना त्या ठिकाणी एका दुचाकीला उडवत त्याच ठिकाणी हा ट्रक जाऊन थांबला.

हर्षलच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. अवघ्या साडेतीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. हर्षल धडपड्या स्वभावाचा होता. लहानशा गावातून येऊनही अल्पावधीत त्याने माध्यम क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं. सध्या टाईम्स नाऊ या वाहिनीसाठी कार्यरत होता. त्याआधी त्याने अनेक माध्यमांसाठी काम केलं आहे. त्याने दीपारंभ हा दिवाळी विशेष अंकही संपादित केला होता.
Uran Murder Case : ठरवून भेटले, वाद झाला आणि… उरण हत्या प्रकरणी पोलिसांची माहिती, सूडबुद्धीने तरुणीचा खून?

हर्षलच्या मित्राची सोशल मीडिया पोस्ट

हर्षलच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरुन आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे. अमोल शिंदे नामक हर्षलच्या मित्राने लिहिलेली पोस्ट चटका लावून जाणारी आहे. “मित्रा! दोन दिवस सोबत होतो. किती विषय, किती प्लॅनिंग, किती गोष्टी ठरवल्या. आज दिवसभर सोबत होतो. सोबत बाईकवर होतो. तू मुंबई का नाही गेलास आताच परत? कार मागवली आपण. तिच्यात बसलो गप्पा करत. नंतर तुला थांबवले का नाही आम्ही? तुला का जाऊ दिले? आपल्याला भविष्य का नाही दिसत? तुला जाऊच दिले नसते, यार! तू निघाला मला भेटून. पंधरा मिनिटात तिकडून तुझी बातमी आली. “गरताड बारी जवळ हर्षल भदाणे पाटील दादांच्या कारचा…..”. भाई, तू सदम्यात टाकलेय आम्हाला. तुझा हसतनाचा चेहरा हाँट करतोय! सॉरी, मी नाही थांबलो सिव्हील हॉस्पिटलमध्ये तुला परत आणल्यावर तुला भेटायला. माफ कर!” अशा भावना अमोलने फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.
Sharmila Thackeray : पोलिसांची दहशत नाही, हे पुरुष थांबणार नाहीत, फाशी द्या, उरण हत्या प्रकरणानंतर शर्मिला ठाकरेंचा संताप

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हर्षल यांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे आणि बेदरकार वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वेगवान कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे. अतीव दुःखाचा डोंगर कोसळलेल्या हर्षल यांच्या कुटुंबियांना शासनाने भरीव आर्थिक मदत करावी अशीही विनंती करण्यात आली आहे. या दुःखाच्या काळात मुंबई मराठी पत्रकार संघ हर्षल यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे.

Source link

Dhule AccidentHarshal Bhadane Patil DeathMumbai Journalist Deathtruck accidentधुळे ट्रक अपघातधुळे बातम्यामुंबई पत्रकार अपघात मृत्यूहर्षल भदाणे पाटील
Comments (0)
Add Comment