आमदार भाजपचा, दावा शिंदेसेनेचा; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पराभवानंतर कॉन्फिडन्स वाढला

बदलापूर : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आता मुरबाड मतदार संघात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्रित होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. एवढेच नव्हे तर शिंदेसेनेने थेट या मतदारसंघावर आपला दावा करत आमदार किसन कथोरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर मुरबाड मतदार संघातून आमदार किसन कथोरे यांनी तीन वेळा विजय प्राप्त केला आहे. विजयाची हॅट्ट्रिक केलेले किसन कथोरे यांच्या मुरबाड मतदार संघातच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेने सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवात शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होत असताना आता म्हात्रे आणि कथोरे यांच्यातच राजकीय वाद पेटला आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरे यांच्या प्रचार कार्यात शिंदेंच्या शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही, हे कारण पुढे करत बदलापूरचे शहर प्रमुख म्हात्रे यांनी आमदार कथोरे यांना आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Supriya Sule : अजित पवार वेश बदलून कसे गेले? सुरक्षेत मोठी हलगर्जी, विमानतळांची चौकशी करा, सुप्रिया सुळे आक्रमक
शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी मुरबाड मतदार संघात शिंदे सेनेची ताकद देखील मोठी असल्याने हा मतदारसंघ शिंदेसेनेला सोडावा, अशी मागणी म्हात्रे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे दुसरे उमेदवार म्हणून पुढे सरसावणारे मुरबाडचे सुभाष पवार यांना देखील बळ देण्याचे काम केले जात आहे. म्हात्रे आणि पवार यांच्या एकजुटीने कथोरे अडचणीत सापडण्याची शक्यता असल्यामुळे म्हात्रे यांनी मुरबाड मतदार संघावर दावा करत राजकीय खेळी सुरू केली आहे.

पवार आणि म्हात्रे हे दोन दावेदार वगळता मुरबाड मतदार संघात कथोरे यांना आव्हान मिळू शकेल असा एकही नेता शिल्लक नाही. त्यामुळे म्हात्रे आणि पवार यांच्या भूमिकेवरच मुरबाड मतदार संघाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पवार आणि म्हात्रे यांच्या विद्रोही भूमिकेला माजी केंद्रीय राज्यमंत्री हे देखील खतपाणी टाकत आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Source link

Eknath ShindeMaharashtra politicsshiv sena vs bjpVaman Mhatreकपिल पाटीलकिसन कथोरेमुरबाड विधानसभाविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment