बारामती की कर्जत? रोहित पवार कुठून लढणार? काँग्रेस पक्षाच्या मागणीने वादाची शक्यता

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून कुटुंबातीलच नाव पुढे केले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार पुन्हा कर्जत-जामखेड मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार असे मानले जात होते. मात्र, आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्या आणि कर्जतची जागा काँग्रेसला सोडा, अशी मागणी करीत यासाठी अॅड. कैलास शेवाळे यांची उमेदवारीही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. ही मागणी पक्षनेतृत्व आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरणार असल्याचे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

कर्जत येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी माहिती देताना ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे म्हणाले, कर्जत-जामखेड हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर, त्यानंतर दोनवेळा निकाळजे गुरुजी, पुढे विठ्ठलराव भैलुमे हे नेते काँग्रेसकडून आमदार झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर बापूसाहेब देशमुख यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती, तर २०१४ मध्ये किरण पाटील पक्षाचे उमेदवार होते. २०१४ मध्ये काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात होता. २०१९ ला मात्र आघाडीत तडजोड होऊन ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. यामध्ये रोहित पवार विजयी झाले. त्यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. मात्र, निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी कायमच काँग्रेसला सापत्न वागणूक दिली. त्यामुळे यावेळी ही जागा काँग्रेसला हवी आहे, असेही शेवाळे म्हणाले.
Chetan Vitthal Tupe: भैया, ‘घड्याळ’ काढलं का? अजित दादांच्या आमदाराने चिन्ह हटवलं, तीन आमदार शरद पवार गटात?

सचिन घुले म्हणाले, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही नेटाने प्रचार करून रोहित पवार यांना विजयी केले. मात्र त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेसला डावलले गेले. कर्जतचे नगराध्यक्षपद, पंचायत समिती सभापतीपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद यासह इतर पदांवर काँग्रेसला संधी देण्याची गरज होती, मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीलाच जास्तीत जास्त संधी देत काँग्रेसवर अन्याय केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.


शहाजीराजे भोसले यांनी बदलते राजकीय समीकरण मांडले. भोसले म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही मानणारे पदाधिकारी आणि मतदार आहेत. यामुळे मतांची विभागणी होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा मतदार आहे तसाच आहे. शिवाय काँग्रेसला या भागात जागा सोडण्यात आलेली नाही. हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसचा आहे. त्यामुळे यावेळी तो पुन्हा काँग्रेसला सोडणे फायदेशीर राहील, असे गणित भोसले यांनी मांडले.

Source link

Congress claim on Karjat Vidhan SabhaKarjat Rohit PawarKarjat Vidhan Sabhancp mla rohit pawarकर्जत विधानसभा काँग्रेस दावाकर्जत विधानसभा निवडणूकरोहित पवार
Comments (0)
Add Comment