Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी मराठ्यांची अवहेलना केली, आरक्षणाचे तेच मारेकरी; बावनकुळेंचा आरोप

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या घरावर आज मराठ्यांचा मोठा मोर्चा आला होतो यावरच भाजपने ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण घालवले असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत इतकेच नव्हे तर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला धक्का बसला असा गंभीर आरोप ठाकरेंवर बावनकुळेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलो होते पण उद्धव ठाकरे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले कारण मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु असताना ठाकरे सरकार मराठा समाजाचे मागसलेपण सिद्ध करु शकले नाही, किंबहुना त्यांनी मराठ्यांच्या बाजूने चांगला वकील सुद्धा लावला नाही त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मातोश्रीवर गेलेल्या मराठा प्रतिनिधीचे ठाकरेंनी अहवलेना केली आहे असे बावनकुळे म्हणाले.
Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

सेना भाजपात बिनसले?

मुंबईतील खराब रस्ते आणि खड्ड्यावरून मोहित कंबोज आणि आमदार आशिष शेलार मुख्यमंत्र्‍यांना मुद्दाम टार्गेट करतायत अशी टीका विरोधकांकडून सुरु होती. अशातच सीएम शिंदेंच्या सेनेत आणि भाजपात बिनसले असे सुद्धा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा फिरत आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्‍यांचा काहीच संबंध नाही. कंत्राटदार जर चुका करत असेल निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर सत्ताधारी असो किंवा विरोधक असेल त्यांना भष्ट्राचार मुक्त काम करण्यासाठी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण विकासकामे भष्ट्राचार मुक्त झाली पाहिजे असे विधान बावनकुळेंनी करत भाजप सेना वादावर पडदा टाकला.


तर दरम्यान आज हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसच्या अपघातावरुन आमदार आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यावर निशाणा साधला. यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव अठरा अठरा तास काम करतात. पक्षासाठी आणि देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. अश्विन वैष्णव यांच्यावर बोलणारे आदित्य ठाकरे यांनी आपली उंची बघून घ्यावी असा बावनकुळेंनी टोला लगावला आहे.

Source link

chandrasekhar bawankule on mahavikas aghadichandrashekar bawankule on sharad pawarchandrashekhar bawankule bjpchandrashekhar bawankule on aditya thackerayचंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे ऑन महाविकास आघाडीचंद्रशेखर बावनकुळे बातम्याचंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षभाजप
Comments (0)
Add Comment