Today Top 10 Headlines in Marathi: मनू भाकर- सरबज्योत सिंग इतिहास घडवला, आता सुवर्णपदकाची संधी; ८ दिवसांपासून पूजा खेडकर गायब

मुंबई: महाराष्ट्र, देश, विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील संध्याकाळी 8 पर्यंतच्या टॉप १० न्यूज खास महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध करून देत आहोत.

पहिली महत्त्वाची बातमी : Manu Bhaker, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सलग दुसरे पदक जिंकून देणारी नेमबाज मनू भाकरला आता तिसरे आणि तेही सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. वाचा सविस्तर बातमी

दुसरी महत्त्वाची बातमी : Pooja Khedkar, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा फोन गेल्या ८ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. वाचा सविस्तर

तिसरी महत्त्वाची बातमी : Amol Mitkari, मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

चौथी महत्त्वाची बातमी : Rohit Pawar, रोहित पवार यांना बारामतीतून उमेदवारी द्या आणि कर्जतची जागा काँग्रेसला सोडा अशी मागणी करण्यात आली आहे.

पाचवी महत्त्वाची बातमी : Ravindra Waikar, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुरेशा सोयी नसल्याबद्दल खासदार रवींद्र वायकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.

सहावी महत्त्वाची बातमी : Raju Shetti, विधानसभा निवडणुकीत शेतकरी चळवळीतील संघटना आणि पक्ष एकत्र येऊन परिवर्तन आघाडी स्थापन केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सातवी महत्त्वाची बातमी : FASTag Rules, फास्टॅग संबंधित नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

आठवी महत्त्वाची बातमी : Police Recruitment, पोलिस भरती प्रक्रियेत Ews प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिले आहेत.

नववी महत्त्वाची बातमी : Sarabjot Singh, मनू भाकरसह देशाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकून देणाऱ्या सरबज्योत सिंह बद्दल जाणून घ्या…

दहावी महत्त्वाची बातमी : Kiran Mane, अभिनेता किरण माने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याची माहिती स्वत: त्यांनी फेसबुकवरून दिली आहे.

Source link

evening top 10 headlineToday Top 10 Headlines in Marathitop 10 headlinesTop 10 Headlines in Marathiटॉप मराठी हेडलाईन्सटॉप १० न्यूजदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Comments (0)
Add Comment