अमुलकुमार जैन, रायगड: राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यानंतर आमदार अमोल मिटकरी अकोल्यात शासकीय विश्रामगृहात उपस्थित असताना त्यांच्या वाहनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना आज दुपारी २.३० वाजता घडली होती. यावर आता कारवाई करण्यात आली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाच्या तोडफोड प्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार अमोल मिटकरी यांची गाडी त्या परिसरात दिसताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी आमदार मिटकरी यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत 189(2), 190, 296, 49, 324(3), 324(4), 333, 351(3)'(3). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मनसे पदाधिकारी सचीन गालट, अरविंद शुक्ला, ललीत यावलकर, जय मालोकार, मंगेश देशमुख, सौरभ भगत, रुपेश तायडे, दिपक बोडखे, मुकेश धोंदफडे, गणेश वाघमारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर देत राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर म्हटले होते. याच रागातून मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत आमदार मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणातील आरोपी फरार असून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.