भीषण! शेतमजूर महिलांना घेऊन जाणारं वाहन पलटी; एका महिलेचा मृत्यू, तर… चालक फरार

निलेश पाटील, जळगाव: सध्या शेतीचे दिवस सुरू असताना शेतात मजुरीसाठी एका वाहनातून महिलांना घेऊन जात असताना धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ वाहन पलटी होऊन मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सात महिलांसह चालक गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात एक महिला जागीच ठार झाली तर इतर ७ महिला आणि वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ताब्यात घेताच गुन्ह्याची कबुली; तिला का संपवलं, पोलिसांच्या चौकशीत दाऊद शेखने काय सांगितलं?

महिला मजुरांना घेऊन जात असताना कार पलटी

जळगावातील धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीजवळून चारचाकी वाहन शेतमजूर महिलांना शेतात कामासाठी घेवून जात होते. मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितच्या पुढे जात असताना रस्त्यावर अचानक ही कार पलटी झाली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात वाहनात बसलेले बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाल्याची माहिती आहे तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

यात जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यातील चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे. तर उषाबाई गुलाब महाजन (वय ३५), निताबाई अशोक महाजन (वय ४०), स्वाती शिवाजी वाघ (वय ३४), जिजाबाई लक्ष्मण महाजन (वय ६०), मधुरी दिपक महाजन (वय ३८), सुमन महाजन, ढगूबाई महाजन हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर वाहन चालक फरार

दरम्यान, अपघात घडल्यानंतर वाहन चालक हा अपघातानंतर वाहन सोडून पसार झाला आहे. जखमींना सुरूवातील धरणगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमोपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Source link

Jalgaonjalgaon accidentjalgaon newslabor accidentwomen laborअपघात बातम्याजळगाव अपघातजळगाव न्यूजजळगाव बातम्याजळगाव महिला मजूर अपघात
Comments (0)
Add Comment