उरण प्रकरणात नवी अपडेट, दाऊदला भेटण्याच्या काही तासांपूर्वी तरुणी मैत्रिणीच्या घरी थांबलेली

नवी मुंबई: उरण येथील २० वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. आरोपी दाऊद शेखने अत्यंत निर्घृणपणे या तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होता. नवी मुंबई पोलिसांनी पाच दिवसांनी त्याला कर्नाटक येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक गुपितं उलगण्याची शक्यता आहे. तर, पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा दुवा लागला आहे. ही तरुणी ज्या मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरातून निघाली होती, त्या मैत्रिणीची पोलिस चौकशी करणार आहेत.

दाऊदला भेटण्यापूर्वी मैत्रिणीकडे थांबलेली

२५ जुलैला ही तरुणी मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती त्या मैत्रिणीच्या घरी गेली. दाऊदला भेटण्यापूर्वी ती या मैत्रिणीच्या घरी थांबली होती. त्या मैत्रिणीचा जबाब आता पोलिस नोंदवणार असल्याची माहिती आहे. दाऊदला भेटण्यापूर्वी तिच्यासोबत नेमकं काय झालं, तिची मनस्थिती कशी होती, तिला कोणाचे फोन येत होते? याची चौकशी पोलिस करत आहेत.
ताब्यात घेताच गुन्ह्याची कबुली; तिला का संपवलं, पोलिसांच्या चौकशीत दाऊद शेखने काय सांगितलं?

मैत्रिणीला पीडितेने काय सांगितलं?

पीडित तरुणी दाऊदला भेटण्यापूर्वी मैत्रिणीच्या घरी थांबली होती. तिने दाऊदला भेटण्याचा निर्णय का घेतला, तिच्यावर काही दबाव होता का, तिने मैत्रिणीला दाऊदबद्दल, त्याला भेटण्याबाबत काही सांगितलं होतं का? ही सारी माहिती पोलिस त्या मैत्रिणीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

घरातून निघाली ती परतलीच नाही

२५ जुलैला ही तरुणी सकाळी घरातून निघाली ती रात्री उशीर झाला तरी परतली नव्हती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तिचा शोध घेतच होते त्यात दुसऱ्या दिवशी सकाळी एका पेट्रोल पंपाजवळ तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा पूर्णपणे चिरडण्यात आला होता. अंगावरील कपडे आणि टॅटूवरुन तिची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दाऊद शेखवर आरोप केला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला, तेव्हा दाऊद शेख हा फरार असल्याचं कळलं. पोलिसांनी पाच दिवस त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याला कर्नाटक येथून अटक केली.

Source link

Dawood Shaikh arrested Karnatakanavi mumbai crimeuran murderUran murder caseyashashree shinde murder caseउरण तरुणी हत्याकांडदाऊद शेखनवी मुंबई गुन्हे शाखानवी मुंबई हत्या प्रकरणयशश्री शिंदे
Comments (0)
Add Comment