पुणेकरांचा स्वॅगच वेगळा; वाहनाच्या किमतीपेक्षा दंडच जास्त, १५४ वेळा नियम मोडल्याने कारवाई, किती दंड भरावा लागणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असताना वाहनचालकांची बेशिस्त वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात एका वाहनचालकाने तब्बल १५४ वेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला असून, त्या वाहनावर एक लाख २१ हजार रुपयांचा दंड थकीत असल्याचे दिसून आले आहे. तर, २१ पेक्षा जास्त वाहनांवर १००पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियभंग केल्यामुळे दंड करण्यात आला असून, त्या वाहनचालकांनी हा दंड त्यांनी भरलेला नाही.

वाहतूक नियभंगाचा विक्रमच

वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे जगातील सातव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. सध्या ३२ रस्त्यांवर सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण, शहरात वाहनचालकांकडून बेशिस्त वाढली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये दोन वाहनचालकांनी वाहतूक नियभंगाचा विक्रमच केल्याचे दिसून आले आहे. एका वाहनचालकाने १५४ वेळा वाहतूक नियमभंग केला असून, त्याच्यावर एक लाख २१ हजार रुपये दंड केला आहे. तर दुसऱ्या वाहनावर १३० वेळा कारवाई झाली आहे.

२१ वाहनांवर १०० पेक्षा जास्त वेळा दंड…

शहरात सर्वाधिक वेळा वाहतूक नियमभंग केल्याच्या कारवाईची माहिती वाहतूक पोलिसांनी घेतली. त्यामध्ये २१ वाहनांवर १०० पेक्षा जास्त वाहतूक नियभंग केल्याची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ९८८ वाहनांवर ५० पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमन मोडल्याबाबत कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

वाहन परवाना; परमिट रद्दची कारवाई

वाहतूक नियमनाचे ५० पेक्षा जास्त वेळा उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमभंग केल्याचे दिसून आल्यास आणि त्यांनी दंड थकविल्यास व्यवसायिक वाहनांचे परमीट रद्दची कारवाई केली जाणार आहे. खासगी वाहनचालकांनी ५० पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियभंग केल्यास आणि दंड न भरल्यास त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाणार आहे.

Source link

pune traffic jampune traffic policepune traffic rule violation finetraffic rule violationपुणे बातम्यापुणे वाहतूक बातम्यावाहतूक नियभंग कारवाई
Comments (0)
Add Comment