Mercury Retrograde In Leo : यंदा ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. तसेच श्रावण महिना सुरु होणार असल्यामुळे भगवान शंकराची कृपा अनेक राशींवर राहिल. ५ ऑगस्टला बुध सिंह राशीमध्ये वक्री होणार आहे. बुध हा ग्रह नोकरी, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता या कलागुणांना चांगल्याप्रकारे वाव देतो. परंतु, सिंह राशीत शुक्र असल्यामुळे बुध आणि शुक्राची युती होईल. त्यामुळे लक्ष्मीनारायणचा योग तयार होत आहे. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे ५ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. हा ग्रह २९ ऑगस्टपर्यंत राहिल.
यंदा ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. तसेच श्रावण महिना सुरु होणार असल्यामुळे भगवान शंकराची कृपा अनेक राशींवर राहिल. ५ ऑगस्टला बुध सिंह राशीमध्ये वक्री होणार आहे.
बुध हा ग्रह नोकरी, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता या कलागुणांना चांगल्याप्रकारे वाव देतो. परंतु, सिंह राशीत शुक्र असल्यामुळे बुध आणि शुक्राची युती होईल. त्यामुळे लक्ष्मीनारायणचा योग तयार होत आहे. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे ५ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. हा ग्रह २९ ऑगस्टपर्यंत राहिल.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा अनेक राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. बुधाचा शुभ प्रभाव काही राशींच्या बुद्धिमत्ता आणि संपत्ती वाढ होईल. जाणून घेऊन बुध वक्रीचा कोणत्या ५ राशींना फायदा होईल जाणून घेऊया
बुध वक्रीचा मिथुन राशीवर प्रभाव
बुध मिथुन राशीत तिसऱ्या घरात वक्री होणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. त्यामुळे कुटुंबात आनंद वाढेल. बुधाच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीत चांगले फायदे मिळतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येईल. जोडीदारासोबत तुम्ही चांगले क्षण अनुभवाल. मुलांच्या भविष्यासाठी काही मोठे निर्णय घ्याल.
बुध वक्रीचा सिंह राशीवर प्रभाव
बुध ग्रह सिंह राशीत पहिल्या घरात वक्री होणार आहे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल. या काळात तुम्हाला धनप्राप्तीत यश मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या अनेक नवीन संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे. तसेच तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. बुध वक्री झाल्यामुळे तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. मान-सन्मानात चांगली वाढ होईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे प्लान कराल.
बुध वक्रीचा तुळ राशीवर प्रभाव
बुध ग्रह तुळ राशीत अकराव्या घरात वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि आनंद मिळेल. तुमची सर्व अपूर्ण कामे आज पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ शुभ ठरेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊन संपत्ती वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. या काळात तुम्हाला चांगला नफा होऊन तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.
बुध वक्रीचा धनु राशीवर प्रभाव
बुध ग्रह धनु राशीत नवव्या घरात वक्री होणार आहे. या काळाच तुमच्या विचारात आणि दृष्टिकोनात सकारात्मक बदल होतील. तुम्हाला पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील. तुम्हाला या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. नोकरीत अनेक संधी मिळाल्याने करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आरोग्याच्या समस्येने त्रस्त असल्यास त्यातून सुटका होईल. मानसिक तणावातून आराम मिळेल.
बुध वक्रीचा कुंभ राशीवर प्रभाव
बुध ग्रह कुंभ राशीत सातव्या घरात वक्री होणार आहे. या काळात तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. तुम्हाला सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्ती मिळेल. जोडीदारासोबत सुरु असलेला वाद संपेल. नात्यात गोडवा राहिल. अडकलेला पैसा मिळाल्याने अनेक समस्या सुटतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची चांगली प्रगती होईल. व्यवसायाचा विस्तार चांगल्या प्रकारे होणार आहे. या काळात तुमच्या सुखीसोयींमध्ये चांगली वाढ होईल.
बुध वक्रीचा मीन राशीवर प्रभाव
बुध ग्रह मीन राशीत सहाव्या घरात वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. तुमच्या मानधनात लवकरच वाढ होणार आहे. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञानात वाढ होणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय जीवनात सकारात्मकता घडवून आणेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळेल.