आता जो तो आम्हाला विचारतोय…; भाजपच्या ‘लाडकी बहीण’ पोस्टरवरील महिला भडकल्या, जाब विचारला

पुणे: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं अनेक लोकाभिमुख योजनांची घोषणा केली आहे. यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. गोरगरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील जवळपास दीड कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. पण पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मात्र याच योजनेच्या पोस्टरवरुन अडचण झाली आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी एक पोस्टर छापलं. त्यात दोन महिला दिसत आहेत. आता या दोन महिला पुढे आल्या आहेत. पोस्टरवर फोटो छापण्याआधी आमची परवानगीच घेतलेली नव्हती, असा त्यांचा दावा आहे. नम्रता कवळे आणि त्यांच्या काकू भागीरथीबाई कुरणे यांचे फोटो भाजप आमदारानं पोस्टरवर छापले आहेत. या दोघींनी सोमवारी शिरोळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली.
Devendra Fadnavis: लेट पण थेट? भाजपच्या अध्यक्ष पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा; ‘त्या’ भेटीनंतर नाव आघाडीवर
माझा आणि माझ्या काकींचा फोटो लाडकी बहिणच्या पोस्टरवर आमच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला. फोटो वापरण्याचे तुम्हाला किती पैसे मिळाले असं आता आम्हाला लोक विचारतात. त्यामुळे घरात भांडणं होऊ लागली आहेत, अशी व्यथा कवळेंनी मांडली. आम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्जच भरलेला नाही, असा दावा दोघींनी केला. ‘त्या पोस्टरशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही त्या योजनेसाठी अर्जही दाखल केलेला नाही. आम्हाला एक रुपयादेखील मिळालेला नाही,’ असं कुरणे म्हणाल्या.

दोन महिलांचा फोटो वापरण्यामागे माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण आमदार शिरोळेंनी दिलं आहे. ‘मी सरकारच्या लाडकी योजनेचा प्रचार करत होतो. एका एजन्सीनं ते पोस्टर तयार केलं. त्यासाठीचा फोटो त्यांनी संकेतस्थळावरुन सर्व परवानग्या घेतल्यानंतरच वापरला. त्यासाठीचं शुल्क त्यांना देण्यात आलं. पोस्टरवरील महिलांच्या भावना दुखावल्या असल्यास, त्यांना त्रास झाला असल्यास मी त्यांची माफी मागतो,’ असं शिरोळे म्हणाले.

Source link

bjp mlaMajhi Ladki Bahin YojanaMukhyamantri Majhi Ladki Bahinmukhyamantri majhi ladki bahin schemesiddharth shiroleपुणे न्यूजमाझी लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनालाडकी बहिणचे पोस्टर वादात
Comments (0)
Add Comment