Hema Pimple On Chitra Wagh : दोघींनाही तडीपार करा, हेमा पिंपळे यांचा चाकणकर,चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मंगळवारी (31 जुलै) पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. तर अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. या दोन्ही महिला नेत्यांचा शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी समाचार घेतला आहे.

दोघींनाही महाराष्ट्रातून तडीपार करा

हेमा पिंपळे यांनी रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, ” रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघीही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम त्या करत आहेत. त्यांना कुठली तरी साप शिडी वापरुन राजकारण कामवायचे आहे. दोघी जणी असभ्य आणि असंस्कृत असून त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा. त्या दात काढून चवताळत असतात. त्यांना गुजरातमध्ये पाठवण्यात यावं आणि गुजरातचे राजकारण करायला सांगावं”
UPSCची मोठी कारवाई! वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही

चित्रा वाघ यांना पळता भुई थोडी होईल

हेमा पिंपळे पुढे म्हणाल्या की, ” आम्ही चित्रा वाघ यांच्या कुटुंबात शिरतोय का? तो त्यांचा कौटुंबीक आणि वैयक्तिक प्रश्न आहे.आम्ही चित्रा वाघ यांच्या कुटुंबात शिरलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल. तर रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना म्हणाल्या की, ” सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, असं चाकणकर म्हणतात परंतु सुप्रिया सुळे यांच्या मागे फिरून फिरून तुमच्या चपला झिजल्या. हे त्या विसरल्या आहेत”.

रुपाली चाकणकरांचं वक्तव्य काय ?

रूपाली चाकणकर म्हणाल्या की, ”सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. उरणमध्ये घडलेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना अजित दादांवर बोलण्याची वेळ आली आहे”.

दरम्यान, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून एकमेकांविरोधात टीका टिपणी करत आहेत.

Source link

Chitra Wagh leatest newschitra wagh newsChitra Wagh on Supriya SuleHema PimpleHema Pimple newsHema Pimple On Chitra Waghचित्रा वाघचित्रा वाघ बातम्याचित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीकाहेमा पिंपळे
Comments (0)
Add Comment