Central Railway Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलच्या लागल्या रांगा

मुंबई : मध्य रेल्वेवरील वाहतूक सध्या काही काळासाठी विस्कळीत झाले असल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या विभागाकडून साधारण ५ वाजून १८ मिनिटांनी लोकलच्या अपडेटबद्दल माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक काही कारणास्तव विस्कळीत झाली आहे असे ट्वीट मध्य रेल्वेने केले आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी जमली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनलकडून सुटणाऱ्या गाड्या खूप उशीराने सुटत आहेत. तसेच अनेक रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी सुद्धा उफाळली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेचे ट्वीट काय?

मध्य रेल्वेने केलेल्या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या वतीने बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या सर्व डाऊन लोकल अंबरनाथपर्यंत धावतील आणि पुन्हा CSMT म्हणून परत धावतील असा मेसेज मध्य रेल्वेने ट्वीटमधून केला आहे. याच रेल्वेच्या ट्वीटवर प्रवाशांनी मध्य रेल्वेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबद्दल भाष्य केले आहे. एका युजरने लिहले आहे एक दिवसही मध्य रेल्वे नीट धावू शकत नाही खेदजक, तर दुसऱ्या युजरने लिहले मागील ३० मिनिटांपासून कल्याणसाठी लोकल नसल्याने, ठाणे स्थानकावर उभा आहे. तर तिसऱ्या युजरने थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना टॅग करत ट्रेन उशीरा असल्याचे काय कारण आहे असा थेट जाब विचारला आहे.


ट्रेनमधील काही प्रवाशांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार बदलापूर स्टेशन नजीक मालगाडीचा इंजिन घसरले आहे. त्यामुळेच मागील पाऊणतास झाला कल्याण, खोपोली, कर्जत, बदलापूरकडे जाणारी वाहतूक मंदवली आहे. ४० मिनिटे गाडी एकाच ठिकाणी थांबली आहे असे लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. कालसुद्धा असेच सीएसएमटी ते मशीद दरम्यान दुपारी अडीच ते सव्वा तीन दरम्यान सिग्नल बिघाड झाला होता. आधी अप आणि त्यानंतर डाउन मार्गावर बिघाड झाल्याने लोकलच्या रांगा लागल्या होत्या. पावसात मध्य रेल्वेचा अनेकवेळा खोळंबा होतो असे चित्र असताना मागील दोन दिवस सतत झालेल्या घटनामुळे लोकलसेवेवर परिणाम होताना दिसतोय.

Source link

central line local latest newscentral line railway interruptedcentral line railway newsmumbai local news and updateमध्य रेल्वे अपडेटमध्य रेल्वे न्यूजमध्य रेल्वे लाइव्ह न्यूजमुंबई लोकल
Comments (0)
Add Comment