भाजप धमक्यांना भीक घालत नाही
प्रवीण दरेकर म्हणाले की, ” उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगत धमकी दिली आहे. परंतु भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडला आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वात लोकप्रिय नेते वारंवार सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं”.
मुस्लीम मतं मिळाली म्हणून जागा निवडून आल्या
दरेकर पुढे म्हणाले की, ” नडलो तर नडलो स्वतः मात्र बेक्कार पडलो अशी उद्धव ठाकरे यांची हाल आहे. मोदी कामातून जनतेला जिंकत आहेत. लोक तुम्हाला विधानसभेला उत्तर देतील. उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मते मिळाले म्हणून काही जागा निवडून आल्या. विधानसभेला मोदींची गरज नाही. तुम्हाला शिंदे-फडणवीसच पुरेसे आहेत”.
‘आरे च्या भाषेला कारे’असं उत्तर देऊ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपल्या अधिकृत ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून ठाकरेंवर टीका ते म्हणाले की ,” उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे. हे राज्य संस्कारमय राज्य आहे. सर्व धर्म, सर्व समाज येथे एकत्र राहतो. जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे”. भाजपा ‘आ रेच्या भाषेला का रे’ अशा शब्दात उत्तर देईल असेही बावनकुळे म्हणाले.