Vantara Jamnagar: जुन्नर तालुक्यातील १० बिबट्यांना अखेर ‘वनतारा प्राणी संग्रहालय’ हलविण्यात आले

पुणे (जुन्नर): गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या गुजरात येथील जामनगर निवारा केंद्रामध्ये जुन्नर तालुक्यातील दहा बिबट्यांना अखेर आज स्थलांतरित करण्यात आले. जगातील सर्वात मोठे असणारे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र ‘वनतारा प्राणी संग्रहालय’ येथे दहा बिबट्यांना हलविण्यात आले आहे. अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांनी दिले आहे.

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती. बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मध्ये ५ बिबट वाहुन नेण्याची क्षमता आहे. दोन ॲंम्ब्युलन्समध्ये १० बिबटे तर एक ॲंम्ब्युलन्स ही अतिताडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे.
UPSCची मोठी कारवाई! वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही

गुजरातहून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे तीन ॲंम्ब्युलन्स आज सकाळी पोहचल्या. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचली होती. माणिकडोह व वनविभाग जुन्नर चे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात १० बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले.
Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे, फडणवीसचं राजकारण संपवायला तुम्हाला १०० जन्म लागतील; बावनकुळेंचा पलटवार

यात अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहायक वनसंरक्षक जुन्नर, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे १० बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले. या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे.
Central Railway Big Megablock: मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल होणार; एकूण इतक्या गाड्या रद्द

बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांचे गुजरातचे पथक अॅम्ब्युलन्ससोबत असणार आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अॅम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षित पणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अॅम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास ‘ब्रेकडाउन व्हॅन’ ही दिमतीला देण्यात आली आहे.

जुन्नर वन विभागाने येथील मानव -बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात सह इतर तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. बिबट्या हे मानवी वस्तीत घुसून मनोहर हल्ले करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मात्र आता यातील दहा बिबटे गुजरातला पाठवण्यात आले आहेत.

Source link

leopards from junnar talukavantara jamnagarकेंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरणजुन्नरबिबट्यांचे स्थलांतरवनतारा प्राणी संग्रहालय
Comments (0)
Add Comment