Radhakrishna Vikhe Patil : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका

अहमदनगर, प्रसाद शिंदे : वांद्रा येथे शिवसेनेने त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आता एक तर तू राहशील किंवा मी उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचा इशारा दिला असून यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र असे विधान करणे म्हणजे वैफल्यग्रस्त माणसाची ओळख असल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला संधी मिळणार नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि जे काही धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा खंबीरपणे मुकाबला करण्यास आम्ही तयार आहोत. आज पर्यंतच्या इतिहासात राजकारणात अशी भाषा कोणीही वापरली नव्हती माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला अशी भाषा शोभत नाही. मात्र आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी याचा खुलासा करावा की तुम्ही या भाषेशी सहमत आहात का असेही यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

शरद पवारांनी आरक्षणाचे अपयश मान्य करावे

मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाचे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटले असता मुख्यमंत्रीना समर्थन देऊ असे आश्वासन शरद पवारांनी दिले होते त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पावरांवर हल्ला चढवला आहे. आम्ही १० % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये मला अपयश आलं हे एकदा मान्य करून टाकावे असे विखे पाटील म्हणाले.
Parinay Fuke : जरांगेंनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात, आमदार परिणय फुकेंचा खोचक सल्ला

दूधाला ३० रुपये दर मिळणार

एक तारखेपासून दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला ३० रुपये दर देणे बंधनकारक केल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखें यांनी दिली आहे. ३० रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. सोबतच दूध भेसळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून ज्या ठिकाणी दूध भेसळ आढळेल तेथे थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देखील राधाकृष्ण विखे यांनी सांगितले ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

एक ऑगस्ट पासून राज्यात महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे महसूल पंधरवाडा सोबतच पहिल्यांदाच पशुसंवर्धन पंधरवाडा देखील साजरा करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितला आहे राज्यातील पशुधन धारक शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणे कडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळावी यासोबतच पशुपालन करत असताना आधुनिक पद्धतींचा वापर आणि पशूंच्या संदर्भातली माहिती आपल्या गोठ्यावरच दिली जाणार आहे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन कार्यक्रम राबवणार असल्याचं विखे यांनी सांगितला आहे

Source link

radhakrishna vikhe patilSharad Pawar on Maratha Reservationuddhav thackeray on devendra fadnavisउद्धव ठाकरेराधाकृष्ण विखे पाटील टीकाराधाकृष्ण विखे पाटील बातमीराधाकृष्ण विखे पाटील वक्तव्यराधाकृष्ण विखे-पाटीलशरद पवार
Comments (0)
Add Comment