Rohini Khadse : गृहखात्यामुळे लाडक्या बहिणीची अब्रू वेशीवर; रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल!

जळगाव, निलेश पाटील : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून राज्य सरकार महिलांची सुरक्षितता करण्यास कमी पडत आहे. उरण, शिळ फाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे. तसेच राज्यात लाडक्या बहिणीचा सन्मान होतो तर दुसरीकडे लाडक्या बहिणींवर अत्याचार होतात ही निंदनीय बाब असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणत सरकारवर टीका केली आहे. शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिनी खडसे यांनी आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला यावेळी त्यांनी सरकार व जोरदार टीकास्त्र सोडले ते म्हणाले एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका राज्यात वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना मन सुन्न करणारी तडे माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. प्रगतशील महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत या सर्वांची मान शरमेने खाली झुकवणाऱ्या आणि अशा नराधमांवर कायद्याचा आणि गृह खात्याचा धाक राहिला नसल्याचे दर्शवणाऱ्या आहेत. नवी मुंबईतील उरण येथील एका बाविस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे.
Crime News: घृणास्पद ! १० वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार, विश्वासाने मुलीला घरी ठेवलं पण घात केलाच, आईची पोलिसांत धाव

याच घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असल्याचे आणि महिलांची सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. महिला अत्याचाराच्या घटनाची केस जलद गती न्यायालयात चालवाव्या त्यासाठी सरकारने अनुभवी वकील नेमावा आणि पिडीत कुटुंबाला सरंक्षण तसेच आर्थिक सहाय्य द्यावे आणि विकृत मानसिकतेच्या पाषाण हृदयी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे.

विकृत आणि मुजोर मानसिकतेला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काठोरातील कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया माता भगिनी आहेत आणि माता भगिनींचा सन्मान करण्याबद्दल मुलांना शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे स्त्रियांवरील अत्याचार समाजात ज्या पद्धतीनेन पहिले जातात, त्यावर सामाजिक भूमिका बदलायला हवी. अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांची भूमिका कणखर होणे आवश्यक आहेच गरजेचे आहे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. महिलांवरील या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व अशा घटना परत घडू नये यासाठी कठोर कायदा करण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी समाजातील सर्व महिलांनी आणि सर्व पक्षातील महिला नेत्यांनी एकत्रित येण्याचे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.

Source link

Devendra FadnavisRohini Khadsewoman violation in maharashtraगृहखातेजळगावमहिला अत्याचाररोहिणी खडसेशरद पवार गट
Comments (0)
Add Comment