शिवेंद्रराजेंच्या फेसबुकवरून अश्लिल व्हिडीओ पोस्ट, पोलिसांकडून हॅकरचा शोध सुरू

सातारा : सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजीच हॅक केलेले आहे. त्याचवेळी याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली आहे.

संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. सुमारे ११ महिन्यानंतर या पेजवर संबंधित हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या पेजवरील पोस्ट व मजकुराकडे कोणीही लक्ष देऊ नये, तसेच सोशल मीडियावरील सर्वांनी हे पेज अनफॉलो करून ब्लॉक करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
सायबरच्या पाठीशी ‘एआय’! राज्य सायबर सेलच्या मदतीला १००हून अधिक सॉफ्टवेअर, असा होणार फायदा

पेक हॅक, रीतसर तक्रार, सायबर सेलकडे तपास

असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या Chh.ShivendraRaje Bhonsle या तत्कालीन फेसबुक पेजवर दररोज आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जात होते. मात्र, ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक करण्यात आले होते. शिवेंद्रसिंहराजेंच्या जनसपंर्क कार्यालयाकडून याबाबतची रीतसर तक्रार त्याचवेळी सातारा सायबर सेलकडे केली होती. याबाबतचे वृत्तही प्रसारमाध्यमांनी त्यावेळी प्रसिद्ध केले होते. या पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून त्याच वेळी करण्यात आले होते.
Satara News: ‘एंजल प्रियेश’ बनून मैत्रिणीला ‘फ्रेण्ड’ केलं, जीव देत असल्याची मस्करी, पण आयुष्याची कुस्करी

अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात

दरम्यान, सुमारे ११ महिने या फेसबुक पेजवर कोणतीही पोस्ट पडली नव्हती. मात्र, अलीकडे म्हणजेच दि. २० जुलै २०२४ रोजी दुपारी तीननंतर या पेजवर हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. ११ महिन्यांनंतर हे पेज ऍक्टिव्ह करून हॅकर त्यावर आता वारंवार अश्लील पोस्ट टाकत आहे. याबाबत पुन्हा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांकडून हॅकरचा शोध

पोलीस हॅकरचा शोध घेत आहेत. हॅक झालेल्या या पेजवर पडणाऱ्या पोस्ट किंवा मजकुराशी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले अथवा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे या पेजवर पडणाऱ्या पोस्टकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स व नागरिकांनी लक्ष देऊ नये, तसेच सोशल मीडियावरील सर्वानीच हॅक झालेले हे पेज अनफ़ॉलो करावे आणि हे पेज ब्लॉक करण्यासाठी फेसबुक, मेटाकडे रिपोर्ट करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.

Source link

satara jawali Mla Shivendraraje Bhosaleshivendraraje bhosaleShivendraraje Bhosale facebook pageShivendraraje Bhosale facebook page hackedशिवेंद्रराजे भोसलेशिवेंद्रराजे भोसले फेसबुक पेज हॅकशिवेंद्रराजे भोसले बातम्या
Comments (0)
Add Comment