लॉग आऊट! शेवटची नोट लिहून १५ वर्षीय मुलाची १४ व्या मजल्यावरुन उडी; वहीतील नकाशांमुळे गूढ कायम

पिंपरी चिंचवड: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील किवले परिसरात १५ वर्षीय मुलानं १४ व्या मजल्यावरुन उडी घेत जीव दिला आहे. आत्महत्या करण्याआधी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. आपल्या वहीवर त्यानं काही रेषा आखून नकाशा तयार केला होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यानं आत्महत्या का केली, टोकाचं पाऊल का उचललं याबद्दलचं गूढ कायम आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय मुलानं २६ जुलैला आत्महत्या केली. इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यानं आयुष्य संपवलं. हा मुलगा त्याची आई आणि भावासोबत राहत होता. त्याची आई पेशानं इंजिनीयर आहे. तर वडील परदेशात असतात. मुलाला ६ महिन्यांपासून ऑनलाईन गेमचं व्यसन लागलेलं होतं. तो अन्नपाणी विसरुन स्वत:ला तासनतास खोलीत कोंडून घ्यायचा, गेम खेळत बसायचा, स्वत:शीच बोलायचा, अशी माहिती मुलाच्या आईनं पोलिसांना दिली.
Crime News: संतापजनक! धावत्या बसमध्ये चालकाकडून तरुणीवर अत्याचार; प्रवासी असतानाही घडला भयंकर प्रकार
काही दिवसांपूर्वी तो गेमच्या टास्कचा भाग म्हणून चाकूनं खेळत होता. २५ जुलैच्या दिवशी तो संपूर्ण दिवस बंद खोलीत होता. रात्री तो जेवण्यासाठी बाहेर आला. त्यानंतर तो पुन्हा खोलीत गेला. लहान मुलाला ताप असल्यानं आई त्याच्या जवळ होती. एक मुलगा इमारतीवरुन पडल्याचा मेसेज सोसायटीच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर मध्यरात्री आला. मेसेज वाचताच आई खोलीत गेली. तिथे तिचा लेक उमेश नव्हता. ती धावत खाली गेली. तेव्हा तिथे तिला उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं निधन झालं होतं.
Crime News: पहिली नोकरी लागल्यानं मित्रांना पार्टी; त्यांनीच सामूहिक अत्याचार केला; एकजण शाळेतला मित्र
आत्महत्या करण्यापूर्वी उमेशनं त्याच्या वहीत काही रेषांच्या आधारे नकाशा तयार केला होता. पोलिसांनी उमेशचा लॅपटॉप तपासला. पण त्याला पासवर्ड असल्यानं तो सुरु करता आला नाही. उमेशला ऑनलाईन गेमचं व्यसन होतं. पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लॉग आऊट नोट असा उल्लेख आहे. त्याच्या वहीत एक नकाशा सापडला आहे. पोलिसांनी उमेशचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. लॅपटॉपचा पासवर्ड कुटुंबियांना माहीत नाही. त्यामुळे पोलीस तज्ज्ञांची मदत घेत आहेत.

उमेशनं लॉग आऊट नोट लिहून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं वहीत काही रेखाचित्र आणि नकाशे काढले. त्यामुळे पोलिसांना संशय आहे. उमेश गच्चीवर जायला घाबरायचा. त्याला उंचीची भीती वाटायची. मग तो एकाएकी इतका कसा बदलला, असा प्रश्न त्याच्या आईला पडला आहे.

Source link

Pimpri Chinchwadpimpri chinchwad suicidepune boy suicidePune newsPune Suicideऑनलाईन गेम आत्महत्यापुणे आत्महत्यापुणे न्यूजपुणे मुलाची आत्महत्या
Comments (0)
Add Comment