२५ जुलै रोजी तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार
२५ जुलै रोजी मिसिंग, तरुणी बेपत्ता (हत्या तेव्हाच झालेली) असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २६ जुलै रोजी रात्री तिचा मृत्यूदेह सापडला. त्यानंतर २७ जुलैला गुन्हा दाखल झाला. तिच्या वडिलांच्या संशयावरुन २९ जुलै रोजी आरोपी दाऊदला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं. ७ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दोघं शाळेत एकत्र होते….
पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि दाऊद दोघं एकाच शाळेत एकत्र शिकायला होते. दाऊद तरुणीच्या मागे लागलेला होता. त्याच्यावर तरुणीच्या वडिलांनी २०१९ मध्ये पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो पोस्को अंतर्गत दीड महिना जेलमध्ये होता.
२३ जुलै रोजी उरणला आला
आरोपी दाऊत २२ जुलैला कर्नाटकामधून निघाला. तो २३ जुलैला उरण आला. २४ जुलै रोजी हाफ डे घेऊन जुईनगर रेल्वे स्टेशनला भेटलेली. तिने मित्राला फोन करून सांगितलं होतं त्याला भेटायला जात आहे.
आरोपीची भेटायला येण्याची मागणी
आरोपी सतत तरुणीला भेटायला ये म्हणून तगादा लावत होता. दाऊद आपल्या सोबतचे फोटो अपलोड करेल असं म्हणत तो ब्लकमेल करत धमक्या देत होता. ती भेटायला येत नसल्याने त्याने सोशल मीडियावर फोटो अपलोड केलेले. मात्र ती भेटायला गेल्यावर त्याने फोटो डिलीट केले. २५ जुलैला दुपारनंतर ते दोघं भेटले. दोघं भेटल्यानंतर त्याने तिला एकत्र राहण्याची विनंती केली. मात्र तिने नकार दिला. भेटायला बोलावलं तर येत नाही, माझ्यासोबत का राहत नव्हती, या गोष्टींवरुन दोघांचं भांडण झालं. आरोपी सतत तिला लग्न करण्याचं सांगत होता.
कर्नाटकाला चल असं तिला बोलत होता. पण तरुणी त्याचं ऐकत नव्हती. त्यानंतर दाऊदने तरुणीवर चाकूने वार केले. पावणे तीनच्या सुमारास ही हत्या झाली असावी असा अंदाज आहे. त्यानंतर तो कर्नाटकात पळाला. तरुणीची हत्या केल्यानंतर दाऊद ट्रेनने पनवेलला आला. पनवेलमधून मित्राच्या एटीएममधून स्टेशनबाहेरुन पैसे काढले आणि कर्नाटकाला गेला.
कंपनीत ड्रायवर होता आरोपी
आरोपी एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याचा मित्र मोसीन हा गुलबर्गामधील घराच्या शेजारी राहत होता. याच्या मोबाईलवरुन तो पीडित मुलीला फोन करायचा. वारंवार संपर्क करत होता, भेटायला यायचा प्रयत्न करत होता. मात्र तरुणी त्याला प्रतिसाद करत नाही, त्यामुळे त्याने ही हत्या करण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज आहे.
२०१९ मध्ये अपघात
२०१९ मध्ये पोस्कोअंतर्गत जेलमध्ये गेल्यानंतर तो गावी गेला. तिथे त्याचा अपघाता झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याने पुन्हा तिला कॉल करुन भेटण्याचं सांगितलं. तो २ ते ३ वेळा भेटायला आलेला. हे लव्ह जिहादचं प्रकरण दिसत नसून हत्या करणं हे त्याचं प्लनिंग असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
कर्नाटकातून शस्त्र घेऊन आला
दाऊद कर्नाटकावरुन येताना शस्त्र घेऊन आला होता. दोघांचं भांडण झाल्यानंतर त्याने जागा मिळेल तसे तरुणीवर त्याने वार केले. चेहऱ्यावरही वार केल्याचं समोर आलं. तरुणीने मित्राला फोन करुन मला वाचव असंही सांगितलं होतं. तिचा मोबाईल पोलिसांना मिळाला नाही. तिचा मोबाईल आरोपी घेऊन गेला होता. त्याने तो कुठे टाकला त्याचा तपास करू असंही पोलीस म्हणाले.