आता तू राहशील नाहीतर मी राहिन, फडणवीसांना थेट इशारा, पक्षातल्या फुटीरांवरही आसूड

मुंबई : मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय, असे सांगतानाच एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा उघड इशाराच मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची मुंबईतल्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणाचा नेहमीप्रमाणे खरपूस समाचार घेतला. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही, अधिकृत चिन्ह नाही, पैसा नाही, पण मी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देऊ शकतो ते केवळ तुमच्या भरोशावर, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आमदार पक्ष कुणाचा? आणि चिन्ह कुणाचे? याविषयीचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण मशालीचा प्रचार घरोघरी करा, असे आदेश त्यांनी शाखाप्रमुखांना दिले.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांनी पेन ड्राईव्ह दाखवला; देवेंद्र फडणवीसांना थेट आवाहन, काही पुरावे असेल तर ते उघड करा

ग्रामीण भागात चोर कंपनीचा प्रचार, अनेकांनी सांगितले-आमची चूक झाली, तुम्हालाच मतदान करायचे होते

ग्रामीण भागात चोर कंपनीने बाळासाहेबांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला मत द्या म्हणून सांगितले. आम्ही तुम्हाला मतदान करू इच्छित होतो पण बाळासाहेबांचा धनुष्यबाण असे म्हणून आम्ही ‘त्यांना’ मतदान केले, आमची चूक झाली, असे काही लोकांनी मला सांगितले. पूर्वी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या म्हणून आपण निवडणूक आयोगात गेलो होतो. आता मशाल हेच चिन्ह आम्हाला अधिकृतपणे द्या, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाला करणार आहोत. तसेच मशालीला साधर्म्य असणारे कोणतेही चिन्ह इव्हीएम ठेवू नका, असेही आपण त्यांना सांगू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Anil Deshmukh: ठाकरे पितापुत्र, अजित पवारांवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव; देशमुखांचे गंभीर आरोप

ज्यांना जायचेय त्यांनी खुशाल जावे, इथे राहून दगाबाजी करू नये

आपल्यातल्या अनेकांना आमच्या पक्षात या म्हणून ‘तिकडून’ फोन येत असतील. आपलेही काही नगरसेवक, माजी नगरसेवक तिकडे जातायेत. ज्यांना जायचेय त्यांनी खुशाल जावे. इथे राहून दगाबाजी करू नये, असे रोखठोकपणे सांगत जे राहतील, त्यांना घेऊन लढू, असा निर्धारच उद्धव यांनी बोलून दाखवला.

आता तू राहशील नाहीतर मी राहिन, फडणवीसांना थेट इशारा

भारतीय जनता पक्ष म्हणजे चोर कंपनी आहे. अनिल देशमुख यांनी नुकतेच माध्यमांत बोलताना सांगितले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कसे डाव खेळले. म्हणजेच हे लोक माझ्या घरावर चालून आले. परंतु हे सगळं सहन करून मी हिमतीने उभा राहिलोय. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले.

Source link

devendra fadanvisShiv Sena Shakha Pramukh melawaUddhav ThackerayUddhav Thackeray SpeechUddhav Thackeray Warning Devendra fadanvisउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे भाषण शाखाप्रमुख मेळावादेवेंद्र फडणवीसशिवसेना शाखाप्रमुख मेळावा
Comments (0)
Add Comment