लग्नासाठी तगादा, तिचा नकार न् दाऊदने तिला निर्घृणपणे संपवलं, वाचा उरण प्रकरणाची इनसाइड स्टोरी

नवी मुंबई: उरण येथे घडलेल्या भीषण हत्याकांडने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. दाऊद शेख या आरोपीने तरुणीला अत्यंत निर्घृणपणे संपवलं. दाऊदने तरुणीला का संपवलं याचं कारणंही आता पुढे आलेलं आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्याने दाऊदने तिचा जीव घेतला, असं तपासात समोर आलं आहे. दाऊदला कर्नाटक येथून अटक करण्यात आलं असून त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांच्या तपासात दाऊदने हत्येची कबुलीही दिली आहे.

नेमकं काय घडलं?

२५ जुलैला सकाळी १० वाजताच्या सुमारास तरुणी घरातून बाहेर पडली. मैत्रिणीकडे जाते असं तिने सांगितलं. त्यानंतर ती मैत्रिणीकडे गेली. तिथून ती दाऊदला भेटायला गेली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. दाऊद तरुणीला आपल्यासोबत पळून जाण्यास सांगत होता. मात्र, तरुणी तयार नव्हती. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणी तिथून जाऊ लागली. तेव्हा दाऊदने मागून तिच्यावर आपल्यासोबत आणलेल्या शस्त्राने वार केले. त्यात तरुणी तिथेच कोसळली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह झुडूपात फेकून तिथून पळ काढला.
Uran Murder Case Update: उरण प्रकरण, तरुणीचा मोबाईल गायब, दाऊद काय लपवण्याचा प्रयत्न करतोय?

शाळेत एकत्र होते

दाऊद आणि तरुणी एकमेकांना ओळखत होते. ते दोघे एकत्र शाळेत असल्याची माहिती आहे. त्यानंतर जेव्हा तरुणी कॉलेजमध्ये होती तेव्हा दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे २०१९ ला तरुणीच्या वडिलांनी दाऊदविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल आणि आणि दाऊदला तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आणि तो कर्नाटकला गेला.

लग्नासाठी तगादा, तिचा नकार

काही काळाने त्याने पुन्हा तरुणीसोबत संपर्क साधला. तो तिला वारंवार भेटायला म्हणत होता. फोटो व्हायरल करण्याच्या धमक्याही देत होता. मात्र, तरुणी त्याला भेटायला नकार देत होती. त्यानंतर २२ जुलैला दाऊद तरुणीला भेटायला निघाला. त्याने सोबत एक धारदार शस्त्रही घेतलं. २३ जुलै तो नवी मुंबईत आला. २३ आणि २४ जुलैला त्याने तरुणीला भेटण्याचा आग्रह केला. पण, ती आली नाही. त्यानंतर अखेर २५ जुलैला अखेर ती भेटायला तयार झाली. दुपारच्या सुमारास तके भेटले, यावेळी त्यांच्यात वाद झाला. माझ्यासोबत पळून ये, आपण लग्न करु आणि बंगळुरुला राहू, असा आग्रह त्याने धरला. याला तरुणीने विरोध केला. त्यानंतर त्याने थेट तिच्यावर चाकूने सपासप वार करत तिचा खून केला.

त्यानंतर तो कर्नाटकला पळून गेला. त्याने आपल्या मित्राच्या एटीएममधून पैसे काढले आणि थेट कर्नाटकला निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी ५ दिवस तो गुंगारा देत होता. पण, अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. सध्या त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस चौकशी करत आहेत.

Source link

Dawood Shaikh arrested Karnatakanavi mumbai crimeuran murderyashashree shinde murder caseउरण तरुणी हत्याकांडदाऊद शेखनवी मुंबई गुन्हे शाखानवी मुंबई पोलीसनवी मुंबई हत्या प्रकरणयशश्री शिंदे
Comments (0)
Add Comment