Pune kondhwa मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या करणावरून तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या करणावरून तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करणाया सोहल जावेद शेख उर्फ सोहेल शुटर याला कोंढवा पोलीसांनी केली अटक.

दि. २१/०७/२०२४ रोजी रात्रौ ०८:०० वा चे सुमारास नवाजीश चौक येथील हयात हॉटेलशेजारी फिर्यादी नामे अरबाज खलील शेख, रा. स.नं. ५२, गल्ली नं ३१, नेहरू पार्क, कोंढवा खुर्द, पुणे हे त्यांचे नातेवाईकांना रिक्षामध्ये बसवित असताना दुचाकी गाडीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांचा धक्का लागल्याने फिर्यादी यांनी त्यास गाडी निट चालविता येत नाही का असे विचारले असता त्यांच्यामध्ये वाद झाला. दुचाकी गाडीवरील तीन इसमांपैकी सोहल जावेद शेख उर्फ सोहेल शुटर याने फिर्यादी यांचा पाठलाग करून त्याच्याकडील धारदार हत्याराने जीवे मराण्याच्या उद्देशने फिर्यादी यांचे गळ्यावर वार करून त्यांना गंभिर जखमी केले. म्हणून फिर्यादी अरबाज खलील शेख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा घडल्यानंतर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकाताली अंमलदार यांनी तपास सुरू केला. सदर आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार संतोष बनसुडे व ज्ञानेश्वर भोसले यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी सोहल जावेद शेख उर्फ सोहेल शुटर हा पारसी मैदान येथे थांबलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे,निलेश देसाई, सतिश चव्हाण, विशाल मेमाणे,गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर,संतोष बनसुडे,ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन,सुरज शुक्ला, व शाहिद शेख यांनी सापळा रचून सदर आरोपी यास पारसी मैदान येथून ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.

वरील नमुद कारवाई ही श्री आर. राजा, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ-५, धन्यकुमार गोडसे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व श्रीमती रूणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे सोबत , सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई,गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, शाहिद शेख, ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment