तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
एका व्यक्तीने हातात दोन कोयते घेऊन सोशल मीडियावर फोटो अपलोड केले. त्याबाबत कारवाई करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Hinjawadi) खंडणी विरोधी पथकाने दरोड्याच्या तयारीत असताना तिघांना अटक केली.
विष्णू दिगंबर पवार (वय 20, रा. वडगाव मावळ, ता. मावळ), करण राहुल लोखंडे (वय 18, रा. काळाखडक, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारांच्या सोशल मीडियावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडणीविरोधी पथकाला एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याने दोन कोयत्यांसह फोटो टाकला असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता फोटोमधील व्यक्ती त्याच्या साथीदारांसह साखरेवस्ती, हिंजवडी येथील एका पडक्या रो-हाऊस मध्ये दिले आहेत. ते घातक शस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून चौघांना ताब्यात(Hinjawadi) घेतले.
त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, एक पालघन, मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे दोन साथीदार ऋषिकेश जाधव आणि बाबू शेख (दोघे रा. काळाखडक, वाकड) हे पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पळून गेले. आरोपींवर जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, चोरी असे सात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, प्रदीप गायकवाड यांच्या पथकाने केली.