ताई माई अक्का, तुमचा पक्ष छ##.. संजय राऊतांची अभद्र टीका, २० फूट गाडू, फडणवीसांना चॅलेंज

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आणलेल्या योजनांवरुन बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. “ताई माई अक्का, तुमचा पक्ष छ##” असं यमक जुळवत राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचं दिसलं

संजय राऊत काय म्हणाले?

माझं तोंड खराब आहे, असं म्हणतात. ताई माई अक्का, माझा पक्ष छ## असं बोललं तर काय होईल? म्हणून मी असं बोलणार नाही, कारण हा त्यांचा अपमान आहे. शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण घडत आहे. खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह करत आहेत. म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतं, असं संजय राऊत म्हणाले.
Congress vs Shiv Sena : जिथे ठाकरेंचे आमदार, तिथेही काँग्रेसची चाचपणी, मुंबईत १६ जागांसाठी इच्छुक, मातोश्रीच्या अंगणावरही नजर
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होणार हे नक्की आहे. कितीही योजना घोषित केल्या, तरी काहीही होणार नाही. नागपूर हा काय त्यांच्या नावावर सातबारा आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
Sujay Vikhe : सुजय विखेंना विधानसभा लढवण्याची इच्छा, थोरातांना बालेकिल्ल्यात टक्कर देण्याचे संकेत
फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असं उद्धव ठाकरे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजवर कोणती संस्कृती आणि नीतीनियम पाळले, जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात, त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे देवेंद्र फडणवीसांकडे पाहून कळते. फडणवीसांसारख्या कपटी-कारस्थानी लोकांमुळे संघ बदनाम झाला, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

मी कुणाच्या नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही, या फडणवीसांच्या आव्हानाच्या व्हिडिओवर बोलताना राऊत म्हणाले की नादी लागू नका असं आम्ही कधी म्हणालो? उलट नादी लागाच.. नादी लागल्यावर काय होतं, ते तुम्हाला लोकसभा निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं आहे. यंत्रणांचं कवच कुंडल काढून समोर या, तुम्हाला २० फूट गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं चॅलेंज दिलं आहे.

Source link

Maharashtra politicsVidhan Sabha Electionउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीससंजय राऊत
Comments (0)
Add Comment