जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा चांगला जोर धरला आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूरसह काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
– गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठा ५४ टक्क्यांवर
– जिल्ह्यातील २४ धरणांमधील एकूण पाणीसाठा २५ हजार ९७४ दशलक्ष घनफूट
– काही तालुक्यांमध्ये पावसाचा चांगला जोर असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविला
– नांदूरमध्यमेश्वर येथून सकाळी ६,७८७ क्युसेकने, तर दुपारी ८,४०१ क्यूसेक विसर्ग
– सायंकाळी पाच वाजता दारणा धरणातून ५ हजार ४२२ क्युसेकने विसर्ग
त्र्यंबकेश्वरमध्ये २७ मिमी पाऊस
बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात २७ मिमी पाऊस झाला. इगतपुरीत २२.९ मिमी पाऊस झाला आहे. पेठ १३.२, दिंडोरीत १०.१ तर सुरगाण्यात १०.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात बुधवारी दिवसभरात १.६ मिमी पाऊस नोंदविला गेला.
धरणनिहाय पाणीसाठा
धरण टक्केवारी
भावली १००
नांदूरमध्यमेश्वर १००
कडवा ८५.४३
दारणा ८५.३०
वालदेवी ६८.५
गंगापूर ६२.६३
हरणबारी ६१.७५
गौतमी गोदावरी ६०.१२
केळझर ४८.२५
पालखेड ४६.५५
पुनद ४५.३७
भोजापूर ४३.४९
चणकापूर ३८.१५
मुकणे ३५.७४
वाघाड ३४.३६
काश्यपी ३२.०२
आळंदी ३०.१५
पुणेगाव २४.२४
करंजवण २१.६९
गिरणा १५.२२
एकूण ३९.५६
पावसाचा जोर कमी; धरणात पाणीसाठा सुरू
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. त्यामुळे धरणात मोठा पाणीसाठा होऊ लागला आहे. परिणामी, कोयना धरणातून सुमारे ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. उरमोडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. २४ तासांत महाबळेश्वरला १५८ आणि नवजा येथे १०७ मिलिमीटरची नोंद झाली.