सिंधुदुर्गच्या रानात बांधलेल्या स्थितीत सापडलेली महिला जूनमध्ये मुंबईत आलेली; कोणाला भेटली?

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनदाट जंगलात साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत सापडलेली अमेरिकन महिला जूनमध्ये मुंबईत येऊन गेली होती. पण मुंबई भेटीमागचा तिचा हेतू अद्याप तरी स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ललिता कायी असं या महिलेचं नाव आहे. ललिता कायी नेमक्या कुठच्या आहेत, त्याची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना मिळाली आहे.

‘आम्हाला ललिता यांच्या ठावठिकाण्याबद्दल बराचसा तपशील मिळाला आहे. त्या अमेरिकेत नेमक्या कुठे वास्तव्यास होत्या याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमची पथकं माहिती पडताळून पाहत आहेत. लवकरच आम्ही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. ललिता कायी १० वर्षांपूर्वी योग शिकण्यासाठी तमिळनाडूला आल्या होत्या. तिथे त्यांनी भारतीय व्यक्तीशी लग्न केलं. त्या काही वर्ष पतीसोबत राहिल्या. याच कालावधीत त्यांनी आधार कार्ड तयार करुन घेतलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Woman Found in Sindhudurg Forest: आधी गोव्यातील हॉटेलात मुक्काम; मग सापडली सिंधुदुर्गातील जंगलात; परदेशी महिलेसोबत काय घडलं?
ललिता काही दिवस गोव्यात वास्तव्यास होत्या. त्यानंतर त्या जूनमध्ये मुंबईत आल्या होत्या. पण त्यांच्या मुंबई भेटीचा हेतू अद्याप तरी तपासातून समोर आलेला नाही. या भेटीबद्दल पडताळणी केली जात आहे. त्या मुंबईत किती दिवस राहिल्या, कोणाला भेटल्या याची माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत.
Sindhudurg Forest News: अमेरिकेची महिला भारतात, कनेक्शन तामिळनाडूशी; सिंधुदुर्गाच्या घनदाट जंगलात घडलेली थरारक स्टोरी!
२७ जुलैला सिंधुदुर्गमधील घनदाट जंगलात ललिता कायी सापडल्या. सोनुर्ली गावाजवळ त्या एका झाडाला साखळदंडानं बांधलेल्या स्थितीत आढळल्या. त्या मदतीसाठी आरडाओरडा करत होत्या. त्यांचा आवाज एका गुराख्यानं ऐकला. आवाजाच्या दिशेनं धाव घेतल्यानंतर गुराख्याला परदेशी महिला साखळदंडानं बांधलेली दिसली. बरेच दिवस काहीच खाल्लं नसल्यानं त्यांना अशक्तपणा आला होता.

ललिता कायी यांच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवर तमिळनाडूचा पत्ता आहे. त्यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्टही सापडला आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. गोव्यातील रुग्णालयात ललिता यांच्यावर उपचार सुरु आहेत. ललिता यांनी पोलिसांकडे कागद मागितला आणि स्वत:ची कैफियत त्यावर मांडली. आपण २५ दिवस काहीच खाल्लं नसल्याचं त्यांनी कागदावर लिहिलं. ललिता यांनी दिलेली माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे.

Source link

Sindhudurgsindhudurg forestwoman chained in forestwoman found in forestWoman Found in Sindhudurg Forestजंगलात सापडली अमेरिकन महिलासिंधुदुर्ग न्यूजसिंधुदुर्ग बातम्यासिंधुदुर्गच्या जंगलात सापडली अमेरिकन महिला
Comments (0)
Add Comment