जितेंद्र आव्हाडांवरील हल्ल्यानंतर ठाण्यात उद्रेक, कार्यकर्ते संतापले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

विनित जांगळे, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात त्याचे पडसाद उमटले. आव्हाड आपल्या निवासस्थानी दाखल होताच संतप्त कार्यकर्त्यानी ठाण्यातील पूर्व दृतगती महामार्गासह मुंब्र्यातील अमृतनगर येथे रास्ता रोको केला. तसेच या हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला. यावेळी आव्हाड समर्थकांनी राज्य सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Jitendra Awhad: संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका, जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत हल्ला

कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला

मुंबईत आव्हाड यांच्या गाडीवर दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. आव्हाड घराजवळ येताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या विवियाना मॉलशेजारील घराजवळून पूर्व दृतगती महामार्गावर धाव घेतली. याठिकाणी संतप्त कार्यकर्ते व महिला पदाधिकाऱ्यांनी महामार्ग रोखला.
ठाण्याच्या वेशीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर

आंदोलनाने वाहतूक विस्कळीत

या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. मुंब्र्याच्या अमृतनगर येथे ठाणे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत निदर्शने केली. त्यामुळे याठिकाणीही वाहतूक विस्कळीत झाली.

संभाजीराजेंना एकेरीत सुनावले

कोल्हापुरातली सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती. ती एकता छत्रपती घराण्याने पुढे जपायला पाहिजे होती. परंतु कुणाचा तरी बोलका बाहुला म्हणून संभाजीराजे बोलले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. संभाजीराजेंच्या वक्तव्यांचा फायदा संभाजी भिडे यांनी घेतला आणि जे करायचे होते ते करून मोकळे झाले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर आव्हाड यांची निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. संताप अनावर झालेल्या आव्हाडांनी संभाजीराजेंना एकेरीतच सुनावले.

Source link

chhatrapati sambhajirajeJitendra Awhadjitendra awhad car attackJitendra Awhad car attack newsswarajya sanghatanaछत्रपती संभाजीराजेजितेंद्र आव्हाडजितेंद्र आव्हाड गाडी हल्ला बातमीस्वराज्य संघटना
Comments (0)
Add Comment