लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (आर्टी) उद्टघान गुरूवारी शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, असा इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता दिला होता. शिंदे यांनी आर्टीच्या कार्यक्रमात बोलताना या इशाऱ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
चांगल्या योजनांमुळे विरोधकांची पोटदुखी
चांगल्या योजनांमुळे विरोधकांची पोटदुखी सुरु झाली असून आता फडणवीस यांना संपविण्याची भाषा केली जात आहे. सरकारने आणलेल्या योजनांचा घाव वर्मी लागला आहे. त्यामुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्हपासून सावध राहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या अगोदर जमा होतील. ही योजना निवडणुकीपर्यंत सुरु राहील असे सांगणाऱ्या या सावत्र भावांना माझ्या बहिणींनी लक्षात ठेवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हलली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हलली आहे. सरकार या योजनांचा विचार गेले वर्षभर करत होते. तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वत्रंत्र मंत्रालय सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.