पुणे : पुण्यातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. लहान मुले एकत्र खेळत असताना गेटमधून सायकल आत घेतल्यानंतर गेट लावून घेताना हे गेट एका तीन वर्ष चिमुकलीच्या अंगावर पडून तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरामध्ये काल बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. गिरीजा शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुलकीचं नाव आहे. गिरीजा तीन वर्षांची होती. बोपखेल भागामध्ये असणाऱ्या गणेश नगर परिसरात ते राहत होते.मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय हे बोपखेल परिसरातील गणेशनगर भागात राहतं. बुधवारी ३१ जुलै दुपारच्या सुमारास गिरीजाही आपल्या शेजारी असणाऱ्या मित्रांसोबत खेळत होती. तिच्या मैत्रिणीबरोबर ती इकडून तिकडे पळत होती. त्याचवेळी त्या खेळत असणाऱ्या मित्रांपैकी एकाने शेजारी असणाऱ्या घराच्या गेटचे स्लाइडिंग ओढले. ते स्लाइडिंग नादुरुस्त होते. मात्र, ते ओढणाऱ्या मुलाला माहीत नव्हते. त्याने पूर्ण स्लाइडिंग उडल्यामुळे ते गिरजाच्या अंगावर पडले. वजनदार गेट चिमुकलीच्या अंगावर पडल्याने ती त्या गेट खाली दबली गेली. तिच्याजवळ असणाऱ्या चिमुकल्यांनी घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना बोलवूनन आणले. घरचे पळत आल्यानंतर ते गेट बाजूला सारून गिरीजाला उचलून घेतले. त्यानंतर तिला गडबडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दिघी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात नोंद करण्यात आली आहे.
चिमुकलीचा अचानक मृत्यू झाल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान मुलांनी खेळ खेळताना जड वस्तूंपासून बाजूला उभे राहून खेळावे. कोणाच्याही मनात नसताना अचानक गिरजा हिला आपले प्राण गमवावे लागले. मुले खेळताना आपल्या आई-वडिलांनी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे आहे. हेच या घटनेवरून दिसून येत आहे.