कोण कुठचा राज ठाकरे, दगडफेकीत माझं बाळ गेलं असतं, मिटकरींच्या भावना, मुख्यमंत्र्यांवर नाराजी

अकोला : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ज्या गाडीवर हल्ला झाला, त्यातून पाच मिनिटांपूर्वी माझ्या तीन वर्षांच्या मुलाला ड्रायव्हरने शाळेत सोडलं होतं, अन्यथा माझ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव गेला असता, अशा भावना मिटकरी यांनी बोलून दाखवल्या. “कोण कुठचा राज ठाकरे, आमच्या अजितदादांवर बोलतो आणि तुम्ही शांत आहात” अशी एकेरी भाषेत टीका करत मिटकरींनी मनसेला पुन्हा डिवचलं. मुख्यमंत्र्यांचा फोन आम्हाला अपेक्षित होता, मात्र तो अद्याप न आला नाही, शिंदे साहेब माझा जीव गेल्यावर शांत होणार का? अशी खंत अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली. अकोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांची कन्याही सोबत होती. “माझे पप्पा स्ट्राँग आहेत” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“या कर्णबाळाला पाठबळ कुणाचं आहे? एक तर मी मरेन किंवा सगळ्यांना घेऊन मरेन. सरकारमधील दोन नेत्यांनी फोन करुनही पोलीस गंभीर का नाहीत? माझ्या मुलीला संविधान घेऊन इथे बसायला लागलं, एका बापाचं अंतःकरण काय बोलतंय, मला प्रश्न विचारा, महायुती, सत्तेतला आमदार जाऊद्या, चुलीत गेलं राजकारण, एखाद्याच्या जीवावर कुणी उठलं असेल, कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे, मी मेलो तर यांना काय मिळणार आहे, एक मुलगा गेला, यांना संवेदना नाहीत, मी मेलो तर या पोरीचं काय?” असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला.

बाळाचा जीव गेला असता

“ज्या गाडीवर यांनी हल्ला केला, पाच मिनिटांपूर्वी माझ्या तीन वर्षांच्या मुलाला त्याच गाडीतून ड्रायव्हरने शाळेत सोडलं होतं, ड्रायव्हर तिथून बाहेर पडला आणि विश्रामगृहात आला, या गुंडांनी दगड मारला, विचार करा, माझ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव नसता का गेला? तुम्हाला लहान बाळ, सहावीतील मुलगी यांच्या बापाला मारुन असुरी आनंद मिळणार असेल, तर बाप म्हणून मी खंबीर आहे, राजकारण गेलं खड्ड्यात, महायुती वगैरे बाजूला, मीही रस्त्यावर उतरलोय.. मी हतबल नाही.. माझ्यावर महायुती सरकारमध्ये ही वेळ आली, याचं गांभीर्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावं” अशी नाराजी मिटकरींनी व्यक्त केली.
Sujay Vikhe : सुजय विखेंना विधानसभा लढवण्याची इच्छा, थोरातांना बालेकिल्ल्यात टक्कर देण्याचे संकेत

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी

“हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासमोर फोनवर सक्त निर्देश दिले होते, की आरोपीवर कठोर कारवाई करुन अंदर करा, एसपींना विचारु शकता, स्वतः अजित पवारांनी या प्रकरणाची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांचा अद्याप फोन आलेला नाही, मला अपेक्षा होती, की मी महायुतीतील एक घटक आहे. त्यांनीसुद्धा विचारपूस करणं, म्हणजे मी हतबल म्हणून नाही म्हणत, राज्याचे प्रमुख म्हणून विचारपूस करणं महत्त्वाचं होतं. कारण मुख्यमंत्री असले, की सामान्य माणूस असो, सत्तेतला आमदार असो किंवा विरोधी पक्षातला, भ्याड हल्ला करणारे गुंड लावारिस सुटतात, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करायला पाहिजे होती, ती अद्याप झाली नाही, हे सांगायला मी यत्किंचितही घाबरत नाही. पंकज साबळे या मूळ आरोपीचे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांशी लांगेबांधे आहेत.” असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

“कोण कुठला राज ठाकरे”

“आता आर या पार होऊन जाऊ दे… राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता मरेल. ज्या प्रमाणे त्या राज ठाकरेवर (एकेरी टीका) बोलल्यावर त्याचे टुकार गुंड बोलतात.. अजितदादांवर बोलल्यावर माझ्या पक्षातील नेत्यांनी तोंड उघडावं, अजित दादा माझे नेते आहेत, एवढीच फक्त भूमिका घेऊ नये, कोण कुठचा राज ठाकरे, आमच्या अजितदादांवर बोलतो आणि तुम्ही शांत आहात, त्यांचे टुकार गुंडे बोलतात. माझा पोलिसांवर विश्वास नाही, पण संविधानावर आहे.” असंही मिटकरी म्हणाले.
Sanjay Raut : ताई माई अक्का, तुमचा पक्ष छ##.. संजय राऊतांची अभद्र टीका, २० फूट गाडू, फडणवीसांना चॅलेंज
विरोधी पक्षाचा आमदार असला, तरी बोलायला हवं, राजेश राठोड यांच्यावर पाठलाग करुन हल्ला झाला, मी सभागृहात त्यांच्या समर्थनात उभा राहिलो की त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या, ही नैतिकता आहे, हे राजकारणाच्या पलिकडचं आहे. मला राज्यभरातील शिवसेना-काँग्रेस आमदारांचे फोन आले. मित्र म्हणून सगळे सोबत आहेत, असंही मिटकरींनी सांगितलं.

Source link

Akola newsAmol Mitkari Akola Press ConferenceAmol Mitkari Car AttackJay MalokarMNS attacks Amol Mitkariअमोल मिटकरीएकनाथ शिंदेकर्णबाळा दुनबळेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरे
Comments (0)
Add Comment