नगर: राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगरमध्ये विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी शरद पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील १२ पैकी ८ जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं लक्ष आहे. याबद्दल शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेंनी शरद पवारांशी चर्चा केली आहे.
‘आपण विधानसभेच्या आठ जागांवर लढायला हवं असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्या आठ मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे,’ अशी माहिती फाळकेंनी दिली. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा विचार करता शरद पवार गट नगरमध्ये सर्वात भक्कम असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमध्ये शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या लेकाला पाणी पाजल्यानं नगरमधील शरद पवार गटाच्या आशा उंचावल्या आहेत.
नगर जिल्ह्यात विखे पाटील कुटुंबाचं वर्चस्व आहे. संस्था, कारखान्यांचं जाळं ही विखे पाटलांची ताकद आहे. पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून लढत लंकेंनी विखे पाटलांना धक्का दिला. त्यानंतर आता विधानसभेसाठी शरद पवारांनी आठ जागांवर तयारी सुरु केली आहे. अकोले, नगर शहर, पारनेर, राहुरी, कोपरगाव आणि कर्जत-जामखेड या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या.
राष्ट्रवाीदी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अकोले, कोपरगाव, नगर शहरचे आमदार अजित पवार गटात गेले. त्यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी ताकद लावली आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या सहा जागांसोबतच श्रीगोंदा आणि शेवगावमध्येही शरद पवारांनी तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुकीत या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.

शरद पवार गट शिर्डीची जागा लढवण्यासही उत्सुक आहे. कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा पराभव करुन जुने हिशोब चुकते करण्याचा पवारांचा मानस आहे. तर पक्षफुटीनंतर साथ सोडणाऱ्या आमदारांना धूळ चारुन पुतण्या अजित पवारांना धक्का देण्यासाठीही शरद पवार फिल्डींग लावत आहेत.