…तर ‘ती’ वाचली असती! उरण प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड; ५ दिवसांपूर्वी नेमकं काय घडलेलं?

नवी मुंबई: उरण हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या विरोधात पोक्सोच्या खटल्यात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं. पोक्सोच्या खटल्यात गैरहजर राहिल्यानं त्याच्याविरोधात पनवेल न्यायालयानं ५ दिवसांपूर्वीच अटक वॉरंट काढलेलं होतं, अशी माहिती आता उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या एक दिवस आधी दाऊदनं तरुणीची जुईनगरमध्ये भेट घेतलेली होती. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

तरुणीसोबत अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी २०१९ मध्ये दाऊदविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी तरुणी अल्पवयीन असल्यानं दाऊदविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे दाऊदला दोन महिने तुरुंगात काढावे लागले. त्यानंतर तो जामिनावर सुटला. त्याच्याविरोधात खटला सुरुच होता. पण तो मोजक्याच सुनावणीवेळी हजर असायचा. त्यामुळेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं. त्याला वेळीच अटक झाली असती, तर पुढील अनर्थ टळला असता आणि तरुणीचा जीव वाचला असता.
Navi Mumbai Murder: फोनवरुन सातत्यानं संपर्कात, भेटही झाली; मग तरुणीला का संपवलं? दाऊद शेखनं सगळं सांगितलं
दाऊद शेखला ३० जुलैला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्यानं पोलिसांना हत्येचं कारण सांगितलं. तरुणीकडे लग्नाचा तगादा लावला होता. लग्न करु आणि कर्नाटकमध्ये राहू, असं दाऊद तरुणीला सातत्यानं सांगत होता. कर्नाटकमध्ये असतानाही तो स्वत:च्या किंवा मित्राच्या फोनवरुन तरुणीला कॉल करायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
Uran Murder Case : उरण हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, मृत तरुणीच्या हातावर दोन टॅटू, एकावर आरोपी दाऊदचं नाव
दाऊदनं तरुणीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. पण ती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नव्हती. तिचा लग्नास ठाम नकार होता. त्यामुळे दाऊदनं तिच्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकले. दोघे भेटल्यानंतर दाऊदनं ते फोटो डिलीट केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दाऊदनं लग्नासाठी तरुणीकडे तगादा लावला होता. पण तरुणी लग्नास तयार नव्हती. तिनं स्पष्ट नकार दिल्यानं दाऊदचा पारा चढला. त्यानं तिच्यावर चाकूनं वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. दाऊदनं तरुणीचा मृतदेह उरण परिसरात टाकला. त्यानंतर तो फरार झाला. त्याला पाच दिवसांनंतर अटक करण्यात आली. पनवेल सत्र न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Source link

navi mumbai murdernavi mumbai uran murderUran murder caseyashshree shinde murderyashshri shinde murderदाऊद शेखनवी मुंबई क्राईमनवी मुंबई खून प्रकरणनवी मुंबई हत्या प्रकरणयशश्री शिंदे हत्या
Comments (0)
Add Comment