उरणमध्ये तरुणीला संपवल्यानंतर दाऊद फरार; अटक टाळण्यासाठी कर्नाटकात दररोज भलताच उपद्व्याप

नवी मुंबई: उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात दिवसागणिक नवी माहिती समोर येत आहे. शनिवारी (२७ जुलै) तरुणीचा मृतदेह नवी मुंबईतील उरणमध्ये सापडला. छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहानं परिसरात खळबळ उडाली. तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह कपड्यांवरुन ओळखला. यानंतर पाच दिवसांनी पोलिसांना आरोपी सापडला. दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. गुलबर्गा जिल्ह्यातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

आरोपी दाऊन शेखनं तरुणीच्या हत्येची योजना कशी आखली आणि अटक टाळण्यासाठी नेमकं काय काय केलं, याचा उलगडा चौकशीतून झाला आहे. २०१९ मध्ये तरुणीच्या पालकांनी दाऊदविरोधात तक्रार केली होती. दाऊदनं लेकीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली. त्यामुळे पॉस्को अंतर्गत दाऊदला दीड महिन्यांचा तुरुंगवास घडला.
Navi Mumbai Murder: तरुणीचा मोबाईल गेला कुठे? पोलिसांना वेगळीच शंका; उरण प्रकरणाला नवं वळण?
तुरुंगातून बाहेर आलेल्या दाऊदला तरुणीसोबत लग्न करुन कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी जायचं होतं. त्यासाठी त्यानं तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पण तरुणीनं त्याचा नंबर ब्लॉक केला. यानंतरही दाऊद स्वस्थ बसला नाही. त्यानं त्याचा मित्र मोहसीनच्या मोबाईलवरुन तिच्याशी संपर्क साधला. मला भेट अन्यथा तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकतो, अशी धमकी त्यानं तरुणीला दिली.

२२ जुलैला दाऊदनं कर्नाटक सोडलं. २३ जुलैला दाऊद नवी मुंबईत पोहोचला. तो त्याच्या मित्राकडे राहिला. त्यानं तरुणीकडे भेटीसाठी तगादा लावला. पण तिनं सुरुवीताला नकार दिला. २५ जुलैला दाऊदनं तरुणीचे खासगी फोटो फेसबुकवर टाकले. तू मला भेटलीस तर ते फोटो डिलीट करेन, अशी अट दाऊदनं घातली. त्यामुळे नाईलाजास्तव तरुणीनं दाऊदला भेटण्यास होकार दर्शवला. त्यासाठी ती हाफ डे घेऊन ऑफिसमधून निघाली. भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि दाऊदनं चाकूनं सपासप वार करत तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह उरण रेल्वे स्थानक परिसरातील झुडूपांमध्ये फेकला.
Navi Mumbai Murder: …तर ‘ती’ वाचली असती! उरण प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड; ५ दिवसांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं उरणहून रेल्वेनं पनवेल गाठलं. तिथून त्यानं एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर त्यानं बसनं कर्नाटक गाठलं. मोबाईलच्या आधारे पोलीस लोकेशन ट्रॅक करतील अशी भीती दाऊदला होती. त्यामुळे त्यानं कर्नाटकमधील त्याच्या आजीकडे फोन दिला. त्यानंतर त्यानं पायी प्रवास सुरु केला. त्याच्या गावाजवळ असलेल्या डोंगराळ भागात तो फिरत राहिला. एका डोंगरावर चढायचं, मग खाली उतरायचं. मग दुसऱ्या डोंगरावर चढायचं, अशा पद्धतीनं आरोपीनं पोलिसांना गुंगारा दिला.

हत्येच्या पाच दिवसांनंतर पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली. कर्नाटकच्या गुलबर्गामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पनवेल न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सध्या दाऊदची चौकशी करत आहेत. काल त्याला घटनास्थळीही नेण्यात आलं. दाऊदनं तरुणीचा खून केल्यानंतर काही अंतरावर तिचा मोबाईल फेकून दिला. तो पोलिसांच्या हाती अद्याप लागलेला नाही. दाऊदनं तिचा फोन फॉरमॅट केला असावा अशी शंका पोलिसांना आहे.

Source link

dawood shaikhnavi mumbai crimenavi mumbai murderUran murder caseyashshree shinde murderउरण हत्या प्रकरणदाऊद शेखनवी मुंबई गु्न्हेनवी मुंबई हत्यायशश्री शिंदे
Comments (0)
Add Comment