पावसाळी पिकनिकहून परत निघाले, कास पठारावर कार ५०० फूट दरीत कोसळली, सात मित्रांसोबत भयंकर

सातारा: यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत त्यावेळी सातजण होते. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरुण कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते कास पठारावर वर्षा सहलीसाठी गेले होते. या घटनेअगोदर यवतेश्वर घाटात या सात तरुणांनी गाण्यावर एकत्र डान्सही केला होता.

या परिसरात पावसाची संततधार असल्याने मदतकार्यात अडचण येत होती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की काेरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील काही तरुण गुरुवारी दुपारी वर्षा सहलीसाठी कास पठारावर गेले होते. सायंकाळच्या सुमारास हे तरुण परत साताऱ्याकडे यायला निघाले होते.
Thane News: घरातून दुर्गंधी, दार उघडताच भयानक दृश्य, आईच्या बॉडीसोबत १४ वर्षांच्या लेकाने काढले चार दिवस

गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् कार थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली

यवतेश्वरजवळील गणेश खिंडीत आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला तेव्हा अपघातग्रस्त गाडीच्या पाठीमागे आणखी एक कार येत होती. त्यावेळी कारमधील तरुणांनी तेथेच थांबून या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांना याची माहिती दिली.

त्यानंतर ट्रेकर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी करून दोराच्या साह्याने दरीत उतरून गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले. त्यानंतर सेफ्टी बेल्ट आणि इतर साधनांच्या साह्याने सर्व जखमींना दरीतून वर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला नाही. त्यामुळे त्यांची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Source link

car fell in kaas pathar valleykaas patharkaas pathar accidentsatara accidentsatara newsकार ५०० फूट खोल दरीत कोसळलीपावसाळी पर्यटनमित्र दरीत कोसळलेसातारा कास पठारसातारा बातम्या
Comments (0)
Add Comment