फडणवीसांना निकटवर्तीयाचा धक्का, बड्या नेत्याची थोरातांसोबत काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थिती

मोबीन खान, शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विविध चर्चांना उधाण आले आहे. शिर्डी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी देताना विचार करावा असं वक्तव्य राजेंद्र पिपाडा यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने पिपाडांच्या मनात चाललंय तरी काय? असाच प्रश्न अनेकांना पडलाय.

राजेंद्र पिपाडा शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्यानंतर आज ते थोरात यांच्या समवेत दिसले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. या सत्कार समारंभाला राजेंद्र पिपाडाही पोहोचले. पिपाडा भाजपची साथ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Ajit Pawar : टोपी घालून मिशी लावल्याचं कुठल्या कॅमेरात दिसलं? वेशांतरांच्या आरोपांवर अजितदादा भडकले, सिद्ध केल्यास राजकारण सोडेन

कोण आहेत राजेंद्र पिपाडा?

राजेंद्र पिपाडा हे पेश्याने होमिओपॅथिक डॉक्टर असून गेल्या २५ वर्षांपासून सामजिक कार्यात आहे. २००९ च्या विधानसभेत त्यावेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना भाजप युतीकडून टक्कर देणारे अशी त्यांची ओळख आहे. राजेंद्र पिपाडा २००१ ते ०६ आणि २०१६ ते २१ राहाता नगरपालिकेचे नगरसेवक राहिले. त्यांच्या पत्नी ममता पिपाडा २००१ ते ०६ आणि २०१६ ते २१ राहाता नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिल्या आहेत. दोन वेळा नगरपरिषद विखेंच्या ताब्यातून त्यांनी स्वतः कडे घेतली आणि त्यांच्या पत्नी ममता पिपाडा नगराध्यक्ष झाल्या होत्या.

२०१४ साली पिपाडा भाजपमध्ये सामील झाले आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
Amol Mitkari : आदित्य ठाकरेही राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हणालेले, दम असेल तर त्यांना हात लावा, मिटकरींनी मनसेला ललकारलं

सुजय विखेंवर केली होती टीका

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राजेंद्र पिपाडा यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांवर टीका केली होती. विखे पाटील मोक्कातील आरोपींच्या कार्यालयाचे उद्घाटन करत असून आरोपींना पाठबळ देत असल्याचे आरोप करताना त्यांनी संपूर्ण प्रकरण निदर्शनास आणून विखेंवर टीका केली होती.

Source link

Balasaheb ThoratDevendra FadnavisMaharashtra politicsShirdiअहमदनगर बातम्यादेवेंद्र फडणवीस निकटवर्तीराजेंद्र पिपाडाविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment