Assembly Elections: इंदापुरातून अजित पवारांना धक्का, प्रवीण माने घड्याळाची साथ सोडून फुंकणार तुतारी

इंदापूर(दीपक पडकर): आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध आडाखे बांधले जात आहेत. असे असतानाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

कधी प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रवीण माने कुटुंबीयांना शब्द दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा प्रवीण माने यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र त्याचवेळी त्यांनी अचानक सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ दिली होती. मात्र आत्ता प्रवीण माने हे घड्याळाची साथ सोडत तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. प्रवीण माने हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान ते प्रवेश करणार आहेत.
Satara News: जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरी ईडी दाखल; आमदारांना वाचवण्यासाठी दबावतंत्र?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. यात इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरची उमेदवारी आप्पासाहेब जगदाळे का? प्रवीण माने या दोघांपैकी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

इंदापूरमध्ये तिरंगी लढत

इंदापूर मतदारसंघातून विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा उमेदवार दिल्यास इंदापूर मध्ये राजकारणाचे गणित बदलणार असून, सध्य परिस्थितीत इंदापूर मध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. एकीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा असून दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्षाची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत.

Source link

assembly elections 2024Indapur Newsmaharashtra politics latest newsmaharashtra politics newsmaharashtra politics news in marathiइंदापूर विधानसभा मतदारसंघउपमुख्यमंत्री अजित पवारप्रवीण मानेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment