Pooja Khedkar: पूजा खेडकर आधी दिल्लीत बड्या नेत्याच्या घरी लपली, मग दुबईला पळाली? नव्या माहितीने खळबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गैरवर्तणुकीपाठोपाठ भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) पदवी संपादन करण्यासाठी बारा वेळा ‘यूपीएससी’च्या परीक्षा देणाऱ्या वादग्रस्त पूजा खेडकरला दिल्लीतील पटियाला हाउस उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता असल्याने तिने देशातून दुबईला पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत नेत्याच्या घरी वास्तव्य?

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरची केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयएएस म्हणून उमेदवारी रद्द केली. त्यापूर्वी खेडकर हिने यूपीएससी अथवा केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून दिल्लीच्या पटियाला हाउस उच्च न्यायालयात अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यासाठी काही दिवस पूजा खेडकर दिल्लीतील एका बड्या नेत्याच्या निवासस्थानी राहिल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.
Pooja Khedkar: पूजा खेडकरचा नवा कारनामा, आयएएसची परीक्षा देण्यासाठी तब्बल सात वेगवेगळी नावं, घोळ काय?
पटियाला हाउस उच्च न्यायालयात बुधवार आणि गुरुवारी अशी दोन दिवस सुनावणी सुरू होती. खेडकर हिच्या वकिलाने युक्तिवाद दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होते. गुरुवारी न्यायालयाने निकाल देताना तिचा अटक पूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्यानेच तिने भारताबाहेर पळ काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती दुबईला फरारी झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मात्र, ती दुबईला फरार होत असताना त्याबाबत पोलिस; तसेच अन्य यंत्रणा दक्ष नव्हत्या का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

खेडकरने बारा वेळा परीक्षा दिल्याचे यूपीएससीने केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने खेडकर हिला नुकतीच दहा पानांची नोटीस पाठविली होती. त्यावर दोन ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यापूर्वी यूपीएससीने तिच्यावर कारवाईचा बडगा उगारून तिची उमेदवारी रद्द केली; तसेच यापुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास बंदी घातली आहे.

‘डॅमेज कंट्रोल’ची भूमिका?

खेडकर प्रकरण वेगळे वळण घेत असल्याने केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊ ‘डॅमेज कंट्रोल’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडून तिला नोटीस पाठविली जाणे आणि त्यापूर्वीच ‘यूपीएससी’ने आयएएस रद्द करण्याची कारवाई करणे हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.

Source link

delhi policeias officer pooja khedkarPooja Khedkarpuja khedkar newsPunePune newsपूजा खेडकरपूजा खेडकर अटकपूर्व जामीनपूजा खेडकर दुबईला पळालीपूजा खेडकर प्रकरण
Comments (0)
Add Comment