Shomita Biswas: राज्याच्या प्रशासकीय कामकाजात ‘महिला राज’; शोमिता बिश्वास ठरल्या पहिल्या महिला वनबल प्रमुख

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला, मुख्य सचिव पदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर शोमिता बिश्वास यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रशासकीय सेवेतील सर्व प्रमुख सेवांचे नेतृत्त्व सध्या महिलांच्या हाती आले असल्याने आता खऱ्या अर्थाने महिला राज सुरू असल्याचे प्रशासकीय सेवेतील महिलांची भावना आहे.

शोमिता बिश्वास या १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या खांद्यावर अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला असला तरी बिश्वास यांनी काही दिवसांपूर्वीच मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून नागपूर येथे स्वीकारला.
PV Sindhu Pain: ऑलिम्पिकमधील निराशाजनक पराभवानंतर सिंधूने मनातल्या भावना व्यक्त केल्या; भविष्याबाबत घेतला निर्णय

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणजेच वनबल प्रमुख या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्रीमती विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य नागपूर या पदावर काम केले आहे. राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे.
Satara News: जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरी ईडी दाखल; आमदारांना वाचवण्यासाठी दबावतंत्र?

याशिवाय त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. राज्य व केंद्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती काम केल्याने शोमिता बिश्वास यांना प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
Assembly Elections: इंदापुरातून अजित पवारांना धक्का, प्रवीण माने घड्याळाची साथ सोडून फुंकणार तुतारी

राज्याच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ आता वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे, ही गौरवाची बाब आहे. – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

Source link

chief conservator of forests of the stateshomita biswasप्रधान मुख्य वनसंरक्षकरश्मी शुक्लाशोमिता बिश्वाससुजाता सौनिक
Comments (0)
Add Comment