BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले

नागपूर (जितेंद्र खापरे) : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असतांना पत्रकारांनी त्यांना या बाबत प्रश्न विचारले असता. फडणवीस यांनी एका वाक्यात याचं उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, चर्चा प्रसारमाध्यमांनी सुरू केली आहे आणि ती केवळ माध्यमांमध्ये आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. २८ जुलै रोजी फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली. यावर आता थेट फडणवीस उत्तर दिले आहे.

पुढे बोलतांना प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, नागपूर जिल्हा नियोजन योजनेत 1200 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने अंदाजे 5000 कोटी रुपये दिले आहेत.तसेच या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा क्षेत्र आणि मूलभूत गोष्टी योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या संरक्षित जंगलांच्या आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता आम्ही त्यांना सोलर सेन्सिंग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Assembly Elections: इंदापुरातून अजित पवारांना धक्का, प्रवीण माने घड्याळाची साथ सोडून फुंकणार तुतारी

शेतकऱ्यांना वीज बिल माफी

शेतकऱ्यांच्या खासगी रस्त्यांसाठी राखीव निधी ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफीसाठी आम्ही जीआर काढला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांचे बिल भरण्याची गरज नाही. विकासकामे सुरू असतानाच अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण करणारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

Source link

BJP National Presidentdevendra fadnavis bjp presidentdevendra fadnavis latest newsउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभाजप राष्ट्रीय अध्यक्ष
Comments (0)
Add Comment