Jalgaon News: परिवारासह शेतात गेले, पत्नीसमोरच पतीसोबत अनर्थ, कुटुंबाच्या आक्रोशानं गाव हळहळलं, काय घडलं?

निलेश पाटील, जळगाव: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतात पाणी साचले जात आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह असल्याने त्या ठिकाणी भीती निर्माण होत आहे. जळगावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात पावसाच्या पाण्यामुळे विजेचा धक्का लागून व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संजय पाटील हे आपल्या परिवारासह शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना जबर विजेचा धक्का लागला. पत्नी आणि पुतणी समोरच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शेतातच पत्नी आणि पुतणी देखील असल्याने पत्नीने मोठा आक्रोश केला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Raigad News: ताम्हिणी घाटातील वाहतूक ‘या’ तारखेपर्यंत बंद, रस्ता खचल्याने घेतला निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, भैय्याभाऊ उर्फ संजय बापू पाटील (वय ४२, रा. धानवड ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह गावात राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतावर परिवारासह गेले होते. त्यावेळी पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी जात असताना त्यांना विजेचा धक्का जोरात लागून ते फेकले गेले. दरम्यान त्यांची पत्नी आणि पुतणी हे शेतातच होते. त्यांच्या समोर ही घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मनमिळावू आणि मेहनती शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने धानवड गावात शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लहान मुलांचे पितृछत्र हरपल्यानं गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

jalgaon newsjalgaon rain newsman dies due to electric shockrain newsजळगाव विजेचा धक्काविजेच्या धक्क्याने व्यक्तीचा मृत्यूसंजय बापू पाटील बातमीसंजय बापू पाटील मृत्यू
Comments (0)
Add Comment