अमुलकुमार जैन, रायगड: माणगाव मार्गे ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता पुणे जिल्ह्याच्या हद्दीत खचल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे.जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे की, पुणे ते मालेगाव ते पुणे रायगड जिल्हा हद्द ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफचे रुंदीकरणाचे कामकाज चालू असून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मौजे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वर साखळी क्र. ६३/००० येथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद केला होता. या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या कडेला महामार्गाच्या हद्दीत पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती मयत आणि एक व्यक्ती जखमी झाला होता.
दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी मौजे आदरवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील साखळी क्र.६१/६५० ते ६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. हे ठिकाण ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात असून अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे. वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरु असून आता महामार्गावरील वाहतूक या ठिकाणी एका बाजूनेच चालू ठेवलेली आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सदर रस्ता अजून खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तरी शनिवार आणि रविवार या दिवशी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटनासाठी अनेक लोकांची गर्दी होत असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ हा बंद करणे आवश्यक आहे. त्याअर्थी मी डॉ. सुहास दिवसे, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराने मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याचे दिसून येत आहे.

तरी त्या ठिकाणी दुर्घटना टाळणेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ हा रस्ता दि २ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२:०० पासून ते दि ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे,, असे आदेशात नमूद केले आहे. माणगाव मार्गे ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता पुणे जिल्ह्यात हद्दीत खचल्याने दोन ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून पाच ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. म्हणून रोहा अक्कलकोट ही बस पाली मार्गे फिरवण्यात आलेली आहे. या मार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या इतरही काही बस आहेत. त्यांचाही मार्ग बदलण्यात आलेला आहे.